मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
नुकत्याच मणिपूर येथे स्त्रियांच्या संदर्भात घडलेल्या घटनेच्या बाबत निषेध नोंदविण्यासाठी गुरुवारी सायंकाळी नगर वाचनालय मंगळवेढा सभागृहात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ॲड.आरती भिंगे म्हणाल्या की, स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचारांकडे अंधश्रद्धा म्हणून न बघता कायद्याच्या दृष्टिकोनातून कडक उपाययोजना करावी लागेल.
रेश्मा गुंगे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अतिशय मानाचे,
सन्मानाचे स्थान दिलेले असताना सध्याच्या समाज व्यवस्थेत त्यांना हीनलेखून त्यांच्यावर अत्याचार केला जातो आहे.
शिवरायांच्या चरित्रातून आपण काय शिकलो? पांडुरंग जावळे आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, जातीच्या आधाराने अन्याय अत्याचार करण्याचा इतिहास या देशात खूप प्राचीन काळापासून आहे. कोणतेही युद्ध असले तरी स्त्री आणि लहान बालके हेच पहिल्यांदा बळी जातात.
स्त्रियाकडे भोगवादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण जगातील सगळ्याच धर्मांनी दिलेली आहे. हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.आणि स्त्रीला सन्मान मिळवून देण्यासाठी घरातून सुरुवात झाली पाहिजे.
अॅड.रोहिणी पवार आपल्या मनोगतात म्हणाल्या की, इराण अफगाणिस्तान मध्ये स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचारांसाठी अत्यंत कडक कायदे आहेत तसे कायदे आपल्या देशात सुद्धा लागू झाले पाहिजेत. निदान कायद्याच्या भितीने तरी असे अन्याय अत्याचार होणार नाहीत.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ॲड.रमेश जोशी म्हणाले की, मणिपूरच्या स्त्री अत्याचाराच्या घटनेला अनेक पैलू आहेत. तरीसुद्धा ही घटना अत्यंत निंदनीय निषेधार्थ आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ.अतुल निकम म्हणाले की, आजचा समाज आधुनिक प्रचार प्रसार माध्यमांच्या साह्याने प्राचीन काळात असल्यासारखा जाती जातीच्या गटात पुन्हा एकदा विभागला गलेला आहे.
माणूस म्हणून आपण समूहाने राहणं हेच पुढील अन्याय रोखण्याचे एकमेव साधन आहे. मानवतावादी मानवी समूहाची झुंड ही अत्याचार करणाऱ्याला आपली दिंड काढू देणार नाही.
यावेळी लक्ष्मण नागणे म्हणाले की, मणिपूरच्या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनाने न बघता गुन्हेगारांना कडक शासन झाले पाहिजे. यावेळी संविधान संवाद समूहाचे स्वप्निल अशोक शिवशरण, शेतकरी संघटनेचे करपे यांनीही या घटनेचा जाहीर निषेध करून आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ॲड.तरनुम मुजावर, कैलास रणदिवे, औदुंबर ढावरे, ज्ञानेश्वर माने,सुरेश करंदीकर, सुनिल देशमाने,आमुलाल सुतार, शंकर घाडगे,सतिश दत्तू,माणिक गुंगे,सचिन गालफाडे,वसंत रणदिवे, विजयसिंह गायकवाड, बाळकृष्ण पवार, सचिन चव्हाण, एस.बी. सवदी , रवींद्र आठवले,
अशोक गायकवाड, अंबादास पवार, भिमराव घुले, भारत मासाळ,रामचंद्र हेंबाडे, नितीन शिवशरण,निलेश साबळे, दिगंबर कुचेकर,रवि शिरसागर आदी नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.दत्ता सरगर यांनी केले. या सभेच्या आयोजनासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा मंगळवेढा, वारी परिवार अशा अनेक संघटनांनी सहकार्य केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज