mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरात कोरोना टेस्टसाठी जास्त पैसे घेतल्यास होणार कारवाई

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापुरात कोरोना टेस्टसाठी जास्त पैसे घेतल्यास होणार कारवाई

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील खासगीसह कोणत्याही लॅबने आरटीपीसीआर या कोरोना टेस्टसाठी जादा दर घेतल्यास महापालिका प्रशासनाकडून कडक अशी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेतील कोरोना नियंत्रण कक्षाचे प्रमुख धनराज पांडे यांनी दिला आहे.

आरटीपीसीआर या कोरोना टेस्टसाठी शासनाकडून 2 हजार 200 रुपयांचा दर निश्‍चित करण्यात आला आहे. घरी जाऊन रुग्णांची टेस्ट स्वॅब घेतल्यास 2 हजार 800 रुपये दर आहे. परंतु महालक्ष्मी लॅबने टेस्टसाठी 3 हजार रुपये दर आकारल्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी नियंत्रण कक्षाला तक्रार प्राप्त केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशाने 24 तासांत खुलासा द्यावा, अशी नोटीस महालक्ष्मी लॅबला देण्यात आली होती, अशी माहिती नियंत्रण कक्षाचे प्रमुख पांडे यांनी दिली होती.

सरकारच्या नियमानुसार लॅबमधील टेस्टचा दर 2 हजार 200 रुपये असतानादेखील महालक्ष्मी लॅबने तीन हजार रुपये घेतले याबाबत खुलासा करण्याबाबत नोटिसीत कळवले होते. शासनाचा जीआर माहिती नसल्यामुळे आरटीपीसीआर टेस्टसाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीन हजार रुपये घेतले होते, असा खुलासा लॅबने केला. रुग्णाच्या नातेवाईकाला पूर्ण रक्कम परत देण्यात आली असल्याची माहिती महालक्ष्मी लॅबचे प्रतिनिधी यांनी दिली.

सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत स्वॅब तपासण्यासाठी ज्या लॅब जादा दर आकारातील त्यांची तक्रार महापालिकेच्या कोरोना-19 नियंत्रण कक्षाकडे करावी. जादा दर आकारण्यात येणार्‍या लॅबवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोरोना कक्षाचे प्रमुख पांडे यांनी दिला आहे.

अनेक दवाखान्यांची बिले तपासणीत झाली कमी

खासगी दवाखान्यांत उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांकडून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी होत्या. आरोग्यमंत्र्यांनी दवाखान्यांच्या बिलाचे ऑडिट करण्यासाठी ऑडिटर नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ऑडिटरची नियुक्‍ती केली होती. खासगी दवाखान्यांतून उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांची जवळपास 73 बिले ऑडिटरनी तपासणी केली असून 2 ते 35 हजार रुपयांपर्यंतची रक्‍कम तपासणीत कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा, तर दवाखान्यांना चाप बसत आहे.

Action will be taken if more money is taken for corona test in Solapur

( Source : pudhari )

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
राज्यातील ‘या’ भागात आजपासून पावसाचा जोर वाढणार

राज्यातील 'या' भागात आजपासून पावसाचा जोर वाढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

मोठी बातमी! कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

April 30, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

पाणी येण्यापूर्वीच ‘शॉक’! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मंगळवेढ्याचा शेतकरी अंधारात; पिके करपणार? भीमा पट्ट्यातील शेतकऱ्यांवर ‘आस्मानी’नंतर आता ‘सुलतानी’ संकट

April 30, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा