mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्याचा पोरगा श्रीकांत खांडेकर झाला आयएएस; सोलापूर ग्रामीणमधील मुलांनी मारली यूपीएससी परीक्षेत बाजी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शेतकऱ्याचा पोरगा श्रीकांत खांडेकर झाला आयएएस; सोलापूर ग्रामीणमधील मुलांनी मारली यूपीएससी परीक्षेत बाजी


समाधान फुगारे । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा २०१९ परिक्षांचा अंतिम निकाल आज ( दि. ४ ) अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती नियुक्ती यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांनी बाजी मारली आहे.  Shrikant Khandekar became IAS rural Solapur won the UPSC exam


मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील  श्रीकांत खांडेकर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 231 व्या क्रमांकावर आलेला असून श्रीकांतच्या शिक्षणासाठी वडिलांनी तीन एकर जमीन विकली. प्रसंगी व्याजाने पैसे काढून तिन्ही मुलांच्या शिक्षणावर खर्च केले. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत अखेर मुलाने कलेक्‍टर होण्याचे ध्येय पूर्ण केले.

तर पंढरपूरमधील शेतकरी कुटुंबातील अभयसिंह देशमुखने यूपीएससी परीक्षेत १५१ वे स्थान पटकावले असून त्याची आयएएससाठी निवड झाली आहे.तर खर्डी येथील राहुल चव्हाण यांनी यश संपादन केले आहे. राहुल चव्हाण यांना यूपीएससी परीक्षेत 109 वा रँक मिळाला आहे.विशेष म्हणजे या दोन्ही युवकांचे शालेय आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे पंढरपुरातच झाले.


तर, अक्कलकोटचा योगेश कापसे,अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या माढा तालुक्यातील उपलाई बुद्रुक येथील अश्विनी वाकडे हिने २०० वा रँक मिळवला असल्याची माहिती मिळत आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये झाली होती, तर मुलाखती फेबु्रवारी आणि आॅगस्ट २०२० मध्ये घेण्यात आल्या होत्या. याच परीक्षेत वाघोली (ता.माळशिरस) येथील सागर मिसाळ हाही उत्तीर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, देशात प्रदीप सिंह हा पहिला आला असून त्यापाठोपाठ जतिन किशोर, प्रतिभा वर्मा, हिमांशू जैन, जयदेव सी. एस यांनी पहिल्या ५ मध्ये स्थान मिळवले आहे.

मराठमोळ्या अभिषेक सराफ हा महाराष्ट्रातून प्रथम आला असून त्याने पहिल्या १० यशस्वी उमेदवारांच्या यादीत आठवे स्थान मिळवले आहे. अभिषेक याच्यासह नेहा भोसले हिने १५ वे तर मंदार पत्की याने २२ वे स्थान मिळवले आहे.


सप्टेंबर,२०१९ घेण्यात आलेली लेखी परीक्षा आणि फेब्रुवारी-ऑगस्ट, २०२० मध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या आधारावर आयोगाने गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.निवड झालेल्या उमेदवारांची उपलब्ध जागांनुसार लवकरच नियुक्ती करण्यात येईल. गुणवत्ता यादीनूसार निवड झालेल्या उमेदवारांची आयएएस, आयपीएस, आयएफएस, भारतीय रेल्वे खाते सेवा अंतर्गत रेल्वे गट अ आणि भारतीय टपाल सेवेसह काही इतर सेवांमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जनरल कॅटेगरीमधील ३०४, ईडब्ल्यूएसमधील ७८, ओबीसीमधील २५१, अनुसुचित जातींमधील १२९ तर अनुसुचित जमातींमधील ६७ अशा एकूण ८२९ उमेदवारांचा समावेश आहे. यूपीएससीकडून १८२ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. यातील ९१ उमेदवार जनरल कॅटेगरी, ९ ईडब्ल्यूएस, ७१ ओबीसी, ८ अनुसूचित जाती तसेच ३ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत.

दरम्यान, यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत एकूण २,३०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. परीक्षेचा तिसरा टप्पा म्हणजेच, मुलाखतींची प्रक्रिया १७ फेब्रुवारी २०२० पासून सुरु झाली होती. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे मार्चमध्ये काही मुलाखती स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुलाखती २० ते ३० जुलै दरम्यान घेण्यात आल्या असून यूपीएससीने मुलाखतीत सहभागी झालेल्या सर्व पात्र उमेदवारांना अनेक सुविधा देण्यात आल्या होत्या.

परिक्षेतील टॉप १० उमेदवार

१) प्रदीप सिंह

२) जतीन किशोर

३) प्रतिभा वर्मा

४) हिमांशू जैन

५) जयदीप सी एस

६) विशाखा यादव

७) गणेश कुमार भास्कर

८) अभिषेक सराफ

९) रवि जैन

१०) संजिता मोहापात्रा

यूपीएससी यशस्वितांपैकी काही मराठी नावे पुढीलप्रमाणे –

????रँक आणि नाव

●१५ नेहा भोसले

● २२ मंदार पत्की

● ४४ आशुतोष कुलकर्णी

● ६३ योगेश पाटील

● ९१ विशाल नरवडे

● १०९ राहुल चव्हाण

● १३७ नेहा देसाई

● १३५ कुलदीप जंगम

● १४३ जयंत मंकाळे

● १५१ अभयसिंह देशमुख

● २०४ सागर मिसाळ

● २१० माधव गित्ते

● २११ कुणाल चव्हाण

● २१३ सचिन हिरेमठ

● २१४ सुमित महाजन

● २२६ अविनाश शिंदे

● २३० शंकर गिरी

● २३१ श्रीकांत खांडेकर

● २४९ योगेश कापसे

● ४९७ सुब्रमण्य केळकर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूरकरांना दिलासा! आज एकाचाही मृत्यू नाही,44 नवे कोरोनाबाधित आढळले

सोलापूरकरांना दिलासा! आज एकाचाही मृत्यू नाही,44 नवे कोरोनाबाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 13, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा