मंगळवेढा टाइम्स ऑनलाईन । मी कारसेवक असताना अनेक मित्र राममंदिराच्या मुद्द्यावरून आमची टवाळी करायचे. परंतु, या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून आता राममंदिर उभे राहत आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला मुंबई भाजपच्या वतीने दादर येथील पक्ष कार्यालयात गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलनातील आपले अनुभव सगळ्यांसमोर मांडले.
फडणवीस यांनी म्हटले की, आज मी एक कारसेवक म्हणून कार्यक्रमाला उपस्थित आहे. १८-१९ वर्षांचा असताना मी राम शिलापूजनचा कार्यक्रम हाती घेतला होता. कारसेवक म्हणून मीही त्यावेळी गेलो होतो. अलाहाबादवरून अयोध्येला चालत जात असताना आमच्यावर लाठीमार झाला आणि दूरवर बदायूंमध्ये जेलमध्ये टाकले तीनवेळा कारसेवा झाली. तिन्ही वेळा मी सहभागी झालो होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
त्यावेळी आमचे अनेक मित्र पेपरमध्ये लिहीत होते. ‘मंदिर बनायेंगे, लेकीन तारीख नहीं बतायेंगे’ अशाप्रकारे ते आमची टिंगल करायचे. मात्र, आज सगळ्यांच्या नाकावर टिच्चून राममंदिर उभारले जात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. Tichun Ram Mandir is standing on the noses of those who are tawali on the issue of Ram Mandir
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज