मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे आपल्या कार्यकर्त्यांसह उद्या मंगळवार, दि. २७ जूनला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये बीआरएस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, स्व.भारत नाना हे जनतेत मिसळून काम करत होते, त्यामुळे त्यांना कोणत्या पुढाऱ्यांची गरज नव्हती, जनतेशी नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व असल्यामुळे तीन टर्मला तीन वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवून विरोधकांचा मोठ्या फरकाने त्यांनी पराभव केला होता.
मध्यंतरी भगीरथ भालके हे नॉट रिचेबल होते. त्यामुळे अनेक समर्थक त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा देखील त्यावेळी होती. मात्र भारत नानांना जमलं ते भगीरथ दादांना जमणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
पंढरपूर येथे भालके गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये भालके यांनी आपण असंख्य कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली व आपल्या कार्यकर्त्यांसह येत्या २७ जून रोजी बीआरएस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भगीरथ भालके हे राष्ट्रवादीमध्ये नाराज होते. त्यातूनच त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
भगीरथ भालके यांच्या बीआरएस प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांनी पोटनिवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेतली आहेत. शिवाय पंढरपूर नगरपरिषदेचे आठपेक्षा जास्त नगरसेवक आजी-माजी जि. प., पंचायत समिती सदस्य, कारखान्याचे संचालक त्यांच्यासोबत आहेत.
त्यामुळे भालके यांच्या पक्ष सोडण्याचे परिणाम पंढरपुरात आगामी निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून भगीरथ भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री के अधिकृत बीआरएस पक्षात प्रवेश चंद्रशेखर राव यांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठविले होते, त्या विमानाने जाऊन भालके यांनी सहकुटुंब केसीआर यांची हैदराबाद येथे भेट घेतली होती.
त्यानंतर भालके यांची बीआरएसमध्ये जाण्याची शक्यता बळावली होती. रविवारी भालके यांनी अधिकृत बी आर एस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या निर्णयाचे पंढरपूर व मंगळवेढा येथील कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आपल्या मंत्रिमंडळासह आषाढी एकादशीच्या निमित्ताने २७ जून रोजी पंढरपूरला येणार आहेत. या दरम्यान सकाळी ११ वाजता सरकोली येथे शेतकरी मेळावा होणार आहेत. या मेळाव्यात भालके आपल्य कार्यकर्त्यासह बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. शेतकरी मेळाव्याची तयारी सुरू केली आहे.
अडचणीच्या काळात पक्षाने कायम दुर्लक्ष केले…
स्व. भारतनाना भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत एक लाख पाच हजारांपेक्षा जास्त मते घेतली. पक्षाने विठ्ठल कारखाना अडचणीत असताना मदत केली नाही, पक्षाचे सरकार सत्तेत असतानाही राज्य बँकेचा प्रशासक आमचं ऐकत नाही असं सांगितलं.
■ नानांच्या निधनानंतर आमच्यावर मायेचा हात पक्षाने ठेवणं गरजेचं असताना आपल्याला कायम दुर्लक्षित करून दुय्यम वागणूक देण्यात आली. त्यामुळे व्यथित होतो. सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांचं प्रश्न सोडविणं व स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी बीआरएस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेत असल्याचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज