mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोल्हापूरवर महापुराचे सावट! कोरोना व पूर दोन्ही संकटे एकाचवेळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कोल्हापूरवर महापुराचे सावट! कोरोना व पूर दोन्ही संकटे एकाचवेळी

टीम मंगळवेढा टाईम्स । कोल्हापूरात सरासरी १५० मिली तुफानी कोसळणारा पाऊस, धरण -नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ , पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे होऊ लागलेली वाटचाल यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावर यंदा महापूराचे संकट घोंघावताना दिसत आहे.  Floods hit Kolhapur!  Corona and flood disasters simultaneously

एकीकडे करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याचे आव्हन बिकट बनले असतानाच त्यात आता मोजक्या यंत्रणेनिशी महापूर संकटाचा मुकाबला करावा लागणार असल्याने या दोन्ही आव्हानांना सामोरे जाताना प्रशासनाचा कस लागणार आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर दौलत देसाई यांच्या उपस्थितीत महापुराचा सामना करण्यासाठी नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

कोल्हापूर जिल्ह्याला मागीलवर्षी ऑगस्टमध्ये महापुराचा जबर तडाखा बसून मोठी हानी झाली होती. या संकटातून जिल्हा सावरत असतानाच मार्च महिन्यापासून जिल्ह्यात करोनाचे रुग्ण आढळू लागले. प्रत्येक महिन्याला यामध्ये झपाट्याने वाढ होत गेली. 

त्यात आता जिल्ह्यात करोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसल्याने सर्वपक्षीय कृती समितीला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले आहे. एकीकडे करोनाचे संकट गंभीर बनत चालेले असताना आता महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात जून मध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली . मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने तरारून आलेली पिकं हातची जाण्याची शक्यता निर्माण झाली होती . अशा मोक्याच्या वेळी पावसाचे दमदार पुनरागमन शेतकऱ्यांना सुखावणारे असले तरी प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.पावसाची गती पाहता पंचगंगा नदी आज रात्री इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे जाण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर गावा – गावात दवंडी देऊन नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला जात आहे. 

ही गंभीर परिस्थिती ओळखून जिल्हा प्रशासन दक्ष झाले आहे. प्रत्येक गावात तलाठी , ग्रामसेवकासह सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडल्यास कारवाई केली जाईल , असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

महापुराचा अधिक धोका असलेल्या करवीर तालुक्यातील चिखली व आंबेगाव येथील गावकऱ्यांना स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आ हेत. महापुराचा धोका निर्माण निर्माण झाल्यास बचावासाठी एनडीआरएफची पथके अगोदरच तैनात झाली आहेत. महापुरातील लोकांना बाहेर काढण्यासाठी लाईफ जॅकेटचा वापर करण्याची सज्जता ठेवली आहे. एकंदरीत प्रशासनाने महापुराला सामोरे जाण्याची तयारी केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यातील ‘या’ मंगल कार्यालयातून साहित्यांची चोरी, दोघांविरूध्द गुन्हा दाख

मंगळवेढ्यातील 'या' मंगल कार्यालयातून साहित्यांची चोरी, दोघांविरूध्द गुन्हा दाख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

मोठी बातमी! कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

April 30, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

पाणी येण्यापूर्वीच ‘शॉक’! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मंगळवेढ्याचा शेतकरी अंधारात; पिके करपणार? भीमा पट्ट्यातील शेतकऱ्यांवर ‘आस्मानी’नंतर आता ‘सुलतानी’ संकट

April 30, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा