मंगळवेढा टाईम्स टीम । मंगळवेढा शहरातील श्रीराम मंगल कार्यालयातील ऑफिसमधून १५ हजार रुपये किमतीची डी.व्ही.आर मशिन व अन्य साहित्य चोरल्याप्रकरणी कार्यालयातील कामगार मयूर साबळे,साईराम भंडगे या दोघांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , शिशूविहारसमोर श्रीराम मंगल कार्यालय असून यातील आरोपी मयूर साबळे हा कार्यालयात कामगार आहे.
दि. १६ रोजी सायंकाळी सकाळी १०.०० च्या दरम्यान वरील दोघा आरोपींनी ऑफिसमधून १५१५० रुपये किमतीचे डी.व्ही. आर . मशिन , एच.डी.डी .१ टी.बी. कंपनीची डिस्क , जी.ओ . कंपनीचा डोंगल असे साहित्य चोरून नेल्याची फिर्याद मंगल कार्यालयाचे मालक तथा फिर्यादी अजित रामचंद्र जगताप यांनी दिल्यानंतर वरील दोघांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास पोलिस नाईक तुकाराम कोळी हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज