मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा प्रांत अधिकारी कार्यालयाच्या बाहेर प्रहार संघटनेने अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन सुरू केल्यापासून कोणीच दखल न घेतल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, फटेवाडी, भाळवणी या भागातून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा 132 के व्ही उपकेंद्रासाठी गेलेला विद्युत वाहिनीच्या टाॅवर व त्या टॉवरच्या तारेखालील खालील झाडाचा मोबदला मिळत नाही.
त्यासाठी 2018 पासून शेतकरी वंचित मोबल्यापासून वंचित राहिले आहेत त्यासाठी प्रहार संघटनेने मंगळवेढा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनी अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाकडे मंगळवेढा प्रांत साहेबांनी पाठ फिरवली आहे महापारेषांनचे अधिकारी तर शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा ऐकून घेत नाहीत.
त्यामुळे ते फिरकलेच नाहीत कारण या महापारेषांच्या अधिकाऱ्यांनी मोठमोठ्या पुढाऱ्यांना टावरचे पैसे दिलेत किंवा तारा खालील झाडाचा मोबदला दिला आहे.
पण गरीब शेतकऱ्यांना त्या मोबदल्यापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे महापारेषणच्या अधिकाऱ्यांचा घोटाळा किंवा घोळ उघड प्रहार लवकरच करणार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवरचे काम चालू होते त्यावेळी त्या शेतकऱ्यांच्या शेतात पोलीस बंदोबस्त लावून या अधिकाऱ्यांनी काम करून घेतले.त्यावेळी शेतकऱ्यांना लगेच मोबदला देऊ असे सांगितले होते
ते शेतकरी 2018 पासून ते आजपर्यंत मोबदल्यासाठी धडपडत आहेत 2013 ला सुरुवात झाली या कामासाठी 2018 साली पंचनामे झाले तेव्हापासून आज तागायत शेतकरी वंचित राहिला आहे.
त्यामुळे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या संघटनेने या शेतकऱ्यांसाठी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे या आंदोलनात प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी,
प्रहार चे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे ,तालुका उपाध्यक्ष रावसाहेब बिले, रोहिदास कांबळे ,राहुल खंडेकर बाधित शेतकरी अशोक पवार, अर्जुन पवार ,विठ्ठल सरवदे, तानाजी ,खोमनाळचे उपसरपंच धनाजी ढेंबरे, नानासाहेब नागणे ,
आनंद कोडक, अण्णासाहेब पाटील, विलास कोडक ,अशोक भालेराव, संतोष कलुबर्मे, पांडुरंग वाकडे ,मनोहर कोडक, बाळू खांडेकर ,सुरेश ढेंबरे, वंदना ढेंबरे ,संतोष पांढरे ,चरणदास सरवदे इत्यादी शेतकरी उपस्थित आहेत.
आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे यामुळे या आंदोलनाची तीव्रता प्रहारच्या माध्यमातून वाढवणार आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे असे प्रहार चे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले आहे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज