समाधान फुगारे । कोरोनाच्या संकटातही महाराष्ट्रातील परिस्थिती संयमाने हाताळत राज्याचा गाडा हाकण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यशस्वी ठरले आहेत. ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत पुन्हा एकदा टॉप फाइव्ह’मध्ये येण्याचा बहुमान उद्धव ठाकरे यांना मिळाला आहे.
इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्स या संस्थेच्या वतीने संयुक्तपणे १५ जुलै ते २७ जुलै या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले.यामध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यांतील ग्रामीण व शहरी भागांतील लोकांची मते जाणून घेण्यात आली. त्यांना आपापल्या राज्यातील सरकारबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यापूर्वी जानेवारी महिन्यात असेच सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याच्याशी तुलना करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे दिसून येते.७ टक्के मतांसह या सर्वेक्षणात त्यांनी पाचवा क्रमांक पटकावला आहे.
या आधीही जून महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला होता. आयएएनएस आणि सी वोटर्सकडून संयुक्तरीत्या देशातील व राज्यांतील नेत्यांची लोकप्रियता पाहण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे यांच्या कामाचे लोकांनी कौतुक केले होते. ७६.५२ टक्के मते मिळवत त्यांनी पाचवा क्रमांक पटकावला होता. (सामना)
Uddhav Thackeray is the best Chief Minister in the most popular list in the country
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज