मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
माझ्या पूर्व परवानगीशिवाय माझ्या नावावर बँक ऑफ बडोदा येथे तब्बल दोन लाख रुपये कर्ज काढले आहे. सदर कर्ज हे गोकुळ साखर कारखाना धोत्री व बँक यांनी संगनमत करून हे कृत्य केले आहे.
तरी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा अशी लेखी तक्रार शेतकरी शिवानंद भीमशा गोविंदे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत हकीकत अशी की, तक्रारदार शिवानंद गोविंदे हे हालहळ्ळी (ता. अक्कलकोट) येथील रहिवासी आहेत. तर गोकुळ साखर कारखाना हा धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथे आहे.
मला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, संमतीविना दि. ६ जून २०१७ रोजी शेतात ड्रीप करण्याच्या नावाखाली सदर बँकेकडून २ लाख रुपये कर्ज मंजूर करून घेऊन पैसे लाटले आहेत.
दि.५ मार्च २०२० रोजी बँकेकडून थकीत कर्जाबाबत नोटीस मला बजावली होती. त्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, सदर कारखानाकडून आपणास सदर रक्कम मिळाली होती. ती आजतागायत थकीत आहे.
ती रक्कम तुम्ही सात दिवसाच्या आत आपल्या बँक खात्यावर जमा करावी, अन्यथा आपल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशा नमूद मजकुराची नोटीस बँक ऑफ बडोदा शाखा रेल्वे लाईन, सोलापूर येथील शाखा प्रमुखांच्या स्वाक्षरीने मिळाली होती.
त्यानुसार कारखाना, बँकेत जाऊन चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिले जात आहेत. यामुळे मला कोणत्याही बँकेकडून शेतीसाठी लागणारे कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
तरी संबंधितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असा तक्रारी अर्ज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यामुळे मला न्याय मिळेल. तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोणत्याही बँकेत गरजू शेतकरी योग्य कारणासाठी योग्य कागदोपत्र घेऊन कर्ज मागणीसाठी गेले असता, कर्ज दिले जात नाही. नाही ते कारण सांगून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते.
बँक ऑफ बडोदात माझ्या सही, कागदोपत्र, जामीनदार, सेव्हिंग खाते, वगैरे काहीच नसताना माझ्या सहमतीविना कर्ज कसे काय दिले गेले आहे याचे मला कोडे पडले आहे.
थेट बँकेची थकीत नोटीस माझ्या घरी येताच मला सदर प्रकार माहिती झाला आहे. तेव्हा चौकशी केली असता, अशाच प्रकारे शेकडो शेतकऱ्यांच्या नावाने हा प्रकार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मी याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून त्यावर लवकरच कारवाई करावी- शिवानंद गोविंदे, शेतकरी
सदर शेतकऱ्याने शनिवार, दि. २२ एप्रिल रोजी गोकुळ शुगर चेअरमन व बँक अधिकारी वगैरे मिळून सहमती, संमतीविना माझ्या सात बारा शेतीचा उतारा वापरून २ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची लेखी तक्रार वळसंग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याअंती योग्य ती कारवाई होईल.- अनिल सनगले, सपोनि वळसंग पोलीस ठाणे.( स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज