टीम मंगळवेढा टाईम्स।
गुंतवलेले पैसे दुप्पट करून मिळतात या आमिषाने २५ लाख रुपये गुंतवले, त्यातील फक्त ६६ हजार रुपये परत देऊन २४ लाख ३४ हजार रुपयाची फसवणूक झाली.
या बाबतची तक्रार माधुरी अशोक खाडे (रा. समर्थ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, वासद रोड, सांगोला) यांनी संतोष जनार्दन शिंदे (रा. वासुद, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध केली आहे.
फिर्यादी माधुरी अशोक खाडे यांचे सांगोल्यातील वासुद रोड वरील न्यू इंग्लिश स्कूल समोर किराणा दुकान होते. कोरोनानंतर हे दुकान बंद केले. दुकान चालवत असताना संतोष जनार्दन शिंदे यांची ओळख झाली होती.
संतोष शिंदे यांनी त्याचे स्वतःचे एस. एस. फायनान्स असल्याबाबतची माहिती फिर्यादीस दिली होती. फिर्यादीने त्याच्या फायनान्स मधून २०१८ साली १० हजार रुपये घेतले व वेळेत फेडले देखील होते. त्यानंतर संतोष शिंदे यांनी फिर्यादीस तुमची पैशाची अडचण असेल तर माझ्याकडे पैसे गुंतवा मी तुम्हाला पैसे दुप्पट करून देतो असे सांगितले.
फिर्यादी माधुरी खाडे यांनी ५ ऑक्टोबर २०१९ सालापासून २५ जानेवारी २०२१ सालापर्यंत वेळोवेळी संतोष शिंदे यास चेकने व रोख दुकानातील असे मिळून एकूण २५ लाख रुपये दिले.
त्यानंतर फिर्यादीने हे पैसे परत मागितले असता संतोष शिंदे यांनी फिर्यादीस वेळोवेळी फक्त ६६ हजार रुपये परत दिले. उर्वरित २४ लाख ३४ हजार रुपयाची फिर्यादीने वेळोवेळी मागणी केली. परंतु शिंदे यांनी वेगवेगळी वेगवेगळी कारणे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचे फिर्यातीत म्हटले आहे.
खात्यामध्ये पैसे नसताना दिला चेक
संतोष शिंदे यांनी खाडे यांना त्यांच्या नावाचा चेक दिले. त्यांनी तो चेक बँकेत टाकले असता खात्यात अपुरी रक्कम असल्याने चेक न वटता परत आले आहेत.
त्यामुळे फिर्यादी माधुरी खाडे यांनी संतोष जनार्दन शिंदे यांच्याविरुद्ध चेक द्वारे व रोखीने २५ लाख रुपये घेऊन फक्त ६६ हजार रुपये परत देऊन उर्वरित रक्कम २४ लाख ३४ हजार रुपये परत न देता फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज