टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. आज दि.27 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून दि.28 एप्रिलला मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी ८ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बिगूल वाजला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, पंढरपूर, कुर्डुवाडी, कुर्डुवाडी, मंगळवेढा अक्कलकोट, दुधनी, मोहोळ व सांगोला या आठ बाजार समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. या समित्यांच्या निवडणुकीसाठी आज सोमवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरवात होणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका एप्रिलच्या आत पूर्ण केल्या जाणार आहेत. या बाजार समित्यांची निवडणूक कोणीही शेतकरी (किमान दहा गुंठे शेती नावावर असलेला) लढवू शकणार आहे.
या निवडणुकीसाठी मतदार मात्र पूर्वीप्रमाणे (सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य) असणार आहेत.
पहिल्या टप्प्यात मंगळवेढा, अकलूज, पंढरपूर, कुर्डुवाडी अक्कलकोट या पाच बाजार समित्यांच्या समावेश आहे.
या समित्यांसाठी आज दि.२७ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारणार आहेत. दि.५ एप्रिलला छाननी तर दि.६ ते २० एप्रिल हा कालावधी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आला आहे.
दि.२१ एप्रिलला निवडणूक चिन्हांचे वाटप, दि.२८ एप्रिलला मतदान व मतदान झाल्यावर तीन दिवसांच्या आत मतमोजणी होणार आहे.
दुधनी, मोहोळ व सांगोला या तीन बाजार समित्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे. या समित्यांसाठी २७ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारणार आहेत.
५ एप्रिलला छाननी तर ६ ते २० एप्रिल हा कालावधी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आला आहे. २१ एप्रिलला निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. या तीन समित्यांसाठी ३० एप्रिलला मतदान व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
झेडपी व पंचायत समित्या, नगरपरिषदा यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघणार आहे.
निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या सूचनेनूसार बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी सोमवारी अधिसूचना जाहीर केली जाणार आहे.
जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांपैकी पाच बाजार समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्यात व तीन बाजार समित्यांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घ्याव्यात या संदर्भातील प्रस्ताव सादर केला जाणार आहे. निवडणूक लोकशाही पद्धतीने पार पाडण्यासाठी सहकार विभागाची यंत्रणा सज्ज आहे.- किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज