टीम मंगळवेढा टाईम्स । मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून चक्क मुलाच्या वडिलास भर चौकात झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे घडली. दरम्यान, पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की येथील एका मुलीने तिच्या घराशेजारच्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले आहे.या घटनेची खंत त्या मुलीच्या संबंधित नातेवाईक व भावकीमध्ये होती.
त्याचा राग मनात धरून मुलाच्या वडिलाने फोन का केला, यावरून मागील रागाचा वचपा काढत त्याला घरापासून तीन किलोमीटर अंतरावरून दोरीने बांधून गावापर्यंत मारहाण करत आणले व गावातील भर चौकात लिंबाच्या झाडाला बांधून आणखी मारहाण करण्यात आली.
दरम्यान, या घटनेनंतर काही क्षणात पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी व सलगर हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी आल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
दरम्यान, पोलिसांनी मारहाण प्रकरणातील चौघा जणांना ताब्यात घेतले आहे. इतर सहभागी आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या संकटात जमावबंदीचा आदेश असताना सामूहिकरीत्या मारहाण करण्याच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
The boy’s father was tied to a tree and beaten, keeping in mind his anger over the girl’s abduction on mangalwedha bhalavani.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज