टीम मंगळवेढा टाईम्स।
जिल्हा नियोजन समिती सोलापूर यांच्या निधीतून ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्याच्या विविध गावातील देवस्थानांसाठी ३५ लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सदर तीर्थक्षेत्र विकास योजनेतील भरीव आणि आवश्यक निधीमुळे विविध देवस्थानांच्या भौतिक सोयी – सुविधा अधिक सक्षम होण्यास फार मोठी मदत होणार आहे.
जिल्हा नियोजन समिती सोलापूर या शासननिर्मित संस्थेवर आमदार समाधान आवताडे यांची विशेष सदस्य म्हणून तर पंचायत समिती माजी सभापती प्रदीप खांडेकर यांची सदस्य निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील विविध देव – देवतांची देवस्थाने ही निरनिराळे सण, उत्सव व यात्रा यांच्या धार्मिक सोहळ्यासाठी महत्त्वपूर्ण समजले जातात. त्यामुळे या देवस्थानच्या सर्वांगीण भागाचा कायापालट होण्यासाठी हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
निधी मंजूर झालेली गावे व कामे – ब्रह्मपुरी येथील हनुमान मंदिर देवस्थान येथे मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, माचणूर येथील श्री सिद्धनाथ मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे, रहाटेवाडी येथील श्री हनुमान मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे, आसबेवाडी येथील श्री महालिंगराया (बुटनकेरी) देवस्थान येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे,
हिवरगाव येथील श्री कामसिद्ध देवस्थान येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे, बावची येथील श्री मायाक्कादेवी देवस्थान येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे, कर्जाळ येथील श्री बिरोबा देवस्थान येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे,
येड्राव श्री लक्ष्मीदेवी देवस्थान येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे, मानेवाडी येथील श्री मानेबाबा देवस्थान येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे, सलगर (खु) येथील श्री मायाक्कादेवी देवस्थान येथे संरक्षक भिंत बांधणे,
सोडी येथील श्री रेवनसिद्ध देवस्थान येथे संरक्षण भिंत बांधणे, महमदाबाद (शे) श्री बसवेश्वर देवस्थान येथे यात्री निवास बांधणे, अकोला येथील श्री काळभैरव मंदिर येथील यात्री निवास बांधणे, खवे येथील श्री विस्टवादेवी येथे बोअर, मोटर व पाण्याची टाकी बांधणे.
सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आणखी विस्तारित झाला
मतदारसंघातील रस्ते, वीज व आरोग्य इत्यादी बाबींच्या मूलभूत व पायाभूत विकासासाठी राज्य शासनाकडून भरघोस निधीची उपलब्धता करून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील धोरणात्मक प्रगतीची चाके गतिमान करणारे
लोकप्रतिनिधी आमदार आवताडे यांनी जिल्हा पातळीवरूनही निधी खेचून आणण्यास प्रारंभ केल्याने सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आणखी विस्तारित झाला आहे – सौ. आरती अजय कांबळे ( सरपंच, सलगर खु )
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज