mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अतिरिक्त पाणी वापरामुळे जिल्ह्यातील शेतजमिनीचा पोत बिघडू लागला : जलमित्र बाळासाहेब लवटे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
अतिरिक्त पाणी वापरामुळे जिल्ह्यातील शेतजमिनीचा पोत बिघडू लागला : जलमित्र बाळासाहेब लवटे

 

टीम मंगळवेढा टाईम्स । जमिनीची सुपीकता पीक उत्पादनवाढीसाठी उपयुक्त ठरत असते. मात्र, सध्या उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर आणि अतिरीक्त पाणी वापरामुळे जिल्ह्यातील शेतजमिनीचा पोत बिघडला असून त्यात कॅल्शियम या दुय्यम अन्नघटकाचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी पाणी व माती परीक्षण करणे काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र  जलमित्र संस्थेचे बाळासाहेब लवटे यांनी केले.

ब्रह्मपुरी( ता मंगळवेढा) येथे शेतकरी वाचवा अभियान अंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी रणजितसिंह अशोक पाटील हे होते

 

सोलापूर जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र वाढले असून त्यात पाणी आणि रासायनिक खत वापराचे प्रमाण अतिरिक्त आहे. ऊस आणि फळबागांसाठी पाण्याचा असंतुलित वापर करण्यात येत आहे. त्यातून मंगळवेढा  तालुक्यातील जमिनी वेगाने चोपण होत आहेत.

शेतजमिनीत हायड्रोजन, ऑक्सीजन, कार्बन, स्फुरद आणि पालाश या प्रमुख अन्नघटकांचा समावेश असतो. त्याशिवाय दुय्यम व सूक्ष्म अन्नघटक असतात. रासायनिक खतांच्या अतिप्रमाणामुळे मुख्य अन्नघटकांसह दुय्यम अन्नघटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यातून मातीचे भौतिक गुणधर्म बिघडत असून जमीन नापीक होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

याबाबत सतीश गुरव म्हणाले, ‘खताचा असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली ठेवणे, पाण्याचा अतिवापर यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. या कारणांमुळे उत्पादनवाढीत घट होऊन समस्याग्रस्त क्षेत्रात वाढ झाली आहे’.

 

सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील जमिनीत कॅल्शियम घटकाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याचे प्रमाण ४ ते २७ टक्के आहे. जमिनीत १० टक्क्यांपेक्षा जास्त कॅल्शियम हानीकारक असते. नेमकी उलटी स्थिती जिल्ह्यात आहे. हिरवळीचे पिके जमिनीत गाडून आणि सेंद्रीय खतांचा वापर करून जमीन पूर्ववत सुपीक करता येते. मात्र, त्याबाबत शेतकरी आणि कृषी विभाग या दोन्ही पातळीवर ठोस प्रयत्न नसल्याने जमीन नापिक होण्याचा धोका वाढला आहे.गुणधर्म बिघडलेल्या जमिनीत सुधारणा करणे शक्य आहे. मात्र, शेतकऱ्यांमध्ये जागरुकता नसल्याने सुपीकता टिकवण्यात अडचणी येतात.

यावेळी  सतीश गुरव, सागर गुरव, सुरेश वाघमोडे, सतीश पवार, रवींद्र पुजारी, रणजित पाटील,विकास पुजारी , उदयसिंह पाटील,  प्रशांत पाटील, भोपाळ पाटील, हरिदास चव्हाण, सिद्धेश्वर डोके, गोटू पाटील, प्रवीण पाटील, भारत चौगुले, यासिन सुतार, राजेंद्र पुजारी, मनोज चव्हाण, किशोर देशमुख, महेश पुजारी यांच्यासह माचनूर, रहाटेवाडी, बठाण, ब्रह्मपुरी, या परिसरातील शेतकरी उपस्थित होते

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
प्रेमविवाहातून मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल

प्रेमविवाहातून मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा