टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील गाजलेल्या खून खटल्यामधील मधील आरोपी बाबासाहेब नाईकवाडी व इतर सहा जण यांची पंढरपूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन. के. मोरे यांनी सबळ पुराव्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात सविस्तर वृत्त असे की सन २०१८ मध्ये मंगळवेढा येथील मुरलीधर चौकामध्ये दिनांक २५/४/२०१८ रोजी गणेश पान शॉप जवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास सचिन कलुबर्मे याच्यावर कोयत्याने वार करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला.
त्या हल्ल्यामध्ये सचिन कलुबर्मे यास जबर मार लागल्यामुळे प्रथम मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तेथून सोलापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले परंतु सचिन कलुबर्मे हा मयत झाला.
त्यानंतर दिनांक २६/४/२०१८ रोजी प्रदीप पडवळे नामक व्यक्तीने आरोपी बाबासाहेब नाईकवाडी, पांडुरंग नाईकवाडी, प्रशांत यादव, धनाजी कराळे, विशाल उन्हाळे, अलीम पटेल व शिवराज ननवरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३०७, ५०४, ५०६, १०२ ब, २०१, ३४
तसेच शस्त्र अधिनियम कलम ४२५ या कलमाखाली या कलमान्वये मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली.
सदर फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक पी.एम.मोरे यांनी तपास करून आरोपींना पकडून त्यांना कोर्टात हजर केले.
आरोपी बाबासाहेब नाईकवाडी या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत न्यायालय कोठडीमध्ये जेलमध्येच होते. त्यांना जामीन मिळाला नाही.
परंतु यातील उर्वरित आरोपी यांना पंढरपूर सत्र न्यायाधीश यांनी जामीन मंजूर केल्यामुळे बाकीचे आरोपी जामीनावर बाहेर होते.
पोलीस निरीक्षक मोरे यांनी सदर तपासकामी ४२ साक्षीदारांचे जबाब घेतले. प्रकरणाचा तपास करीत असताना सदर गुन्हा कट करून खुन करण्यात आला.
सदर गुन्ह्याच्या कटामध्ये मुख्य कट आरोपी पांडुरंग नाईकवाडी व प्रशांत यादव यांचे सांगण्यावरून कट रचण्यात आला अशी हकीकत तयार करण्यात आली.
आरोपी पांडुरंग नाईकवाडी व प्रशांत यादव हे मंगळवेढा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक असल्यामुळे सदर प्रकरणास राजकीय वळण लागले होते. त्यामुळे मंगळवेढा तालुका परिसरामध्ये सदर गुन्ह्याबद्दल वारंवार चर्चा होत होती.
प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस निरीक्षक मोरे यांनी सदर आरोपी विरुद्ध चार्जशीट तयार करून मेहरबान कोर्टात दाखल केले.
प्रकरणाचे सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची जबाब उलट जबाब सुनावणीच्या दरम्यान नोंदविण्यात आले.
नंतर आरोपींचे स्टेटमेंट घेण्यात आले. यातील आरोपी तर्फे अॅड. थोबडे यांनी साक्षीदारांची उलट तपास घेतली.
तसेच साक्षीदारांची जबाब मध्ये विसंगती व तपास कामांमधील त्रुटी मे. कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सदर गुन्हा कट रचून करण्यात आलेला नाही व खुनामध्ये आरोपींचा सहभाग दिसून येत नाही असा युक्तिवाद अॅड. मिलिंद थोबाडे यांनी केला.
यात आरोपी यांचे वतीने अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. बापूसाहेब यादव, अॅड. कोष्टी, अॅड. पी. जी. घुले यांनी कामकाज पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज