mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक : पंढरपूरमधील ‘या’ डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
धक्कादायक : पंढरपूरमधील ‘या’ डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू

 


टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर येथील डॉक्टर सचिन रामलाल दोशी ( खटावकर ) यांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर कौठाळी येथे शुक्रवारी नव्याने 6 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गावातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 22 तर तालुक्यातील एकूण बळींची संख्या आता 28 झाली आहे.  Doctor dies due to corona in Pandharpur


पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रकोप कायम असून गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे एका डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आली. वैद्यकीय क्षेत्रात यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती, तथापि एका डॉक्टरावर मृत्यू ओढवण्याची ही पहिलीच दुर्दैवी घटना घडली आहे.


डॉ.सचिन रामलाल दोशी ( खटावकर ) यांना पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता, ते तातडीने पुण्याला उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र उपचारादरम्यान अखेर आज ( शुक्रवारी ) पहाटे पुण्यात नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मावळली.

दोशी हे केवळ चाळीस वर्षे वयाचे होते.तालुक्यातील कासेगावमध्ये ते वैद्यकीय सेवा देत असत. ग्रामीण भागातील एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांचा परिचय होता. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.


दरम्यान , तालुक्यातील कौठाळी येथे शुक्रवारी आणखी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या गावातील एकाच कुटुंबातील 12 लोक पॉझिटिव्ह असल्याने गावात चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाला पायबंद बसावा म्हणून आरोग्य विभागाने उपाययोजना अमलात आणली आहे.12 पॉझिटिव्ह सापडलेल्या कुटुंबाच्या संपर्कातील सर्व लोकांची रॅपिड अँटीजन टेस्ट घेतली जात आहे.

आज तेथील 50 लोकांची टेस्ट घेतली असता 6 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता गावातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 22 झाली आहे.


उद्यापासून पूर्ववत् सुरुवात

पंढरपुरातील लॉकडाऊन हा केवळ आज दिनांक 14 ऑगस्ट पुरताच आहे. उद्यापासून पूर्ण पंढरपूर सुरू होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामध्ये दिनांक 15 ते 31 पर्यंत पूर्वीप्रमाणे लॉकडाऊन सुरू राहील ‘ असे वाक्य आले आहे.  याचा अर्थ सात तारखेच्या पूर्वी जसा अंशतः लॉकडाऊन होता तसा तो सुरू राहील.

म्हणजे सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत व्यवहार सुरू राहतील. वाहनातील प्रवासी संख्या ही पूर्वीप्रमाणेच मर्यादित राहील.

दिनांक सात ऑगस्ट पूर्वी ज्याप्रमाणे लॉकडाऊन होता त्याप्रमाणे तो सुरू राहील असा या आदेशाचा अर्थ अभिप्रेत आहे ल.  त्यामुळे उद्यापासून 9 ते 7 पर्यंत सर्व दुकाने खुली राहतील आणि व्यवहार पूर्ववत होतील.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूर ग्रामीणमध्ये आणखी 288 नव्या कोरोनाबाधितांची भर तर तिघांचा बळी

सोलापूर ग्रामीणमध्ये आणखी 288 नव्या कोरोनाबाधितांची भर तर तिघांचा बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा