टीम मंगळवेढा टाईम्स । मुलाला कोविड-१९ची लागण झाली म्हणून त्याच्या वृध्द पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगोला तालुक्यात घडली. Elderly father commits suicide out of fear of having corona infection
मुलास कोरोनाची लागण झाल्याने भीतीपोटी वृध्द पित्याने घराशेजारी जनावरांच्या पत्राशेड मधील लोखंडी अँगलला नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सांगोला तालुक्यातील बामणी ( शेळकेवाडी ) येथे घडली.आनंदा धोंडीबा कोळेकर ( वय ७० ) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.
बामणी ( शेळकेवाडी ) येथील वामन आनंदा कोळेकर याची ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.
आरोग्य विभागाकडून त्याला कमलापूर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे . त्यानंतर वामन कोळेकर यांच्या घरातील सर्व लोकांची आरोग्य विभागाकडून कोरोना टेस्ट करायची होती.
आपला मुलगा वामन हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आपलीही टेस्ट पॉझिटिव्ह येईल या भीतीपोटी वडील आनंदा कोळेकर यांनी शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घराशेजारील जनावरांच्या पत्रारोड मधील लोखंडी अँगला नायलॉन दोरीने गळफास घेतला.
त्या दरम्यान सून लक्ष्मी कोळेकर या स्वच्छतेसाठी उठल्या असता त्यांना सासरे आनंदा कोळेकर यांनी गोठ्यात गळफास घेतल्याचे दिसल्याने तिने आरडाओरड केली. घरातील लोकांना जागे केले.
मेव्हणे महेश पांढरे,हरी कोळेकर यांनी बेशुद्ध अवस्थेत त्यांना तत्काळ उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ते मयत झाल्याचे सांगितले.
याबाबत मुलगा हरी आनंदा कोळेकर ( रा.बामणी ता.सांगोला) याने पोलिसात खबर दिली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज