टीम मंगळवेढा टाईम्स ।
मूळचा राजगुरूनगर, पुणे येथील रहिवासी आणि नांदेड संघातून उतरलेला शिवराज राक्षे याने मंगळवेढा, सोलापूरचा महेंद्र गायकवाड याला चितपट करीत ६५व्या महाराष्ट्र केसरिचा ‘किताब पटकावला.
महेंद्र गायकवाड ला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले. ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत उत्कंठा निर्माण करणाऱ्या – लढतीत शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला.
रणहलगी आणि तुतारीचा निनाद, प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या प्रतिसादात झालेल्या लढतीत नांदेडकडून खेळणाऱ्या राक्षेने सोलापुरच्या महेंद्र गायकवाडला चितपट केले.
महाराष्ट्र केसरीवर बक्षिसांचा पाऊस
महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे आणि उपविजेत्या महेंद्र गायकवाड हे दोघंही मालामाल होणार आहेत. विजेता आणि उपविजेत्या अशा दोघांनाही बक्षिस देण्यात येणार आहे.
केसरी गदा पटकावणाऱ्या शिवराजला रोख 5 लाख रुपये, आणि महिंद्रा थार गाडी मिळणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपयांचं बक्षिस मिळणार आहे
तत्पुर्वी झालेल्या माती विभागातील अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने सोलापुरच्या सिकंदर शेखचा अटीतटीच्या लढतीत ६ विरुद्ध ४ गुणांनी पराभव केला.
गादी विभागात २०२० सालचा महाराष्ट्र केसरी नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत झाली. यात राक्षे ८ विरुद्ध १ गुणांनी विजय मिळवित सदगीरला धक्का दिला.
दोन्ही मल्ल काका पवार आणि गोविंद पवारांचेच
गादी विभागात शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला अस्मान दाखवले. हे दोघेही काकासाहेब पवार आंतराष्ट्रीय कुस्ती संकुल या एकाच तालमीतील पैलवान आहेत. हर्षवर्धन सदगीरवर शिवराज राक्षेनं ८-१ असा एकतर्फी विजय मिळवला.
शिवराज राक्षे हा राजगुरूनगरच्या राक्षेवाडी (जि. पुणे) येथील आहे. तो वस्तात काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात करतो.
महेंद्र गायकवाड हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातल्या शिरसीचा आहे. हा पठ्ठयाही वस्ताद काका पवार आणि गोविंद पवारांचा शिष्य आहे. तो सुद्धा कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो. दोन्ही मल्ल अंतिम फेरीत सामोरा समोर आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज