समाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज शनिवारी ग्रामीण भागातील तब्बल 330 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 194 पुरुष तर 136 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 186 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 390 इतकी झाली आहे. यामध्ये 4 हजार 432 पुरुष तर 2 हजार 958 महिला आहेत.
यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 205 जणांचा मृत्यू झाला आहे यात 141 पुरुष तर 64 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 905 आहे.
यामध्ये 1 हजार 785 पुरुष 1 हजार 120 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 4 हजार 280 यामध्ये 2 हजार 506 पुरुष तर 1774 महिलांचा समावेश होतो.
‘या’ भागात आढळले नवे रुग्ण
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, परळी, मरवडे, पाटखळ, सलगर, तळसंगी, तामदर्डी, उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर, इंडियन ऑइल डेपो, पाकणी, पडसाळी, वडाळा, सांगोला तालुक्यातील बलवडी, जवळा, कारंडेवाडी, नाझरे, राजुरी, सणगर गल्ली, यलमार, मंगेवाडी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, दर्गनहल्ली, टाकळी,
पंढरपूर तालुक्यातील आढीव, बडवे गल्ली, भक्तिमार्ग, भोसले चौक, दाळे गल्ली, धर्मशाळा, उपजिल्हा रुग्णालय, एकनाथनगर, गादेगाव, गुरसाळे, इसबावी, जुने पेठ, कवठाळी, कोळी गल्ली, लक्ष्मी टाकळी, माहेश्वरी धर्मशाळा, नवी पेठ, परदेशीनगर, पोलिसलाइन, प्रदक्षिणा मार्ग, रोपळे, संत पेठ, सरकोली, सावरकर मैदान, शासकीय वसाहत, सिद्धेवाडी, सुस्ते, तानाजी चौक, तुंगत, उत्पात गल्ली, विवेक वर्धिनी विद्यालयजवळ,
अरळी (ता. अक्कलकोट), दुधनी, गुड्डेवाडी, समर्थनगर, करजगी, खासबाग, कुरनूर, नागणसूर, मानेगाव, करमाळा तालुक्यातील अर्जुननगर, भवानी नाका, भीमनगर, देवळाली, कुंभेज, माढा तालुक्यातील अरण, बेंबळे, भोसले, कुर्डू, कुर्डुवाडी, मोडनिंब, परिते, पिंपळनेर, रणदिवेवाडी, श्रीरामनगर,
माळशिरस तालुक्यातील अकलूज, बोरगाव, कोर्टासमोर, माळशिरस, कोंडारपट्टा, महाळुंग, माळेवाडी, माळीनगर, मांडवे, नातेपुते, पिलीव, संगम, संग्रामनगर, शेंडेचिंच, श्रीपूर, यशवंतनगर, मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी, हराळवाडी, कामती बुद्रूक, कुंभार गल्ली, कुरूल, समर्थनगर, बार्शी तालुक्यातील 422 झोपडपट्टी, आगळगाव, ऐनापूर मारुती रोड, अलीपूर रोड, बारंगुळे प्लॉट, भालगाव, भवानी पेठ, भीमनगर प्लॉट, भवानी पेठ, बुरूड गल्ली, दडशिंगे, दत्तनगर, गाडेगाव रोड, घारी, जैन मंदिराजवळ,
बार्शी-जामगाव रोड, कसबा पेठ, लातूर रोड, लोकमान्यता, मंगळवार पेठ, महादेवी नगर प्लॉट, जैन मंदिराजवळ, मुरलीधर मंदिराजवळ, सह्याद्री खानावळ, सात्विक सौंदर्य, शिवशक्ती मैदान, श्रीपत पिंपरी, धनगर गल्ली, सुलाखे हायस्कूल रोड, सुश्रुत हॉस्पिटल क्वार्टर, ताडसौंदणे, तेल गिरणी चौक, तुळजापूर रोड, उंबरगे, उपळे दुमाला, वैराग प्लॉट, झाडबुके मैदान या ठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.
‘या’ भागातील आठ जणांचा मृत्यू
आज यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील 70 वर्षीय पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 53 वर्षे पुरुष, कोन्हेरी (ता.मोहोळ) येथील 70 वर्षीय पुरुष, शिरनांदगी (ता. मंगळवेढा) येथील 65 वर्षांची महिला, कुर्डू (ता. माढा) येथील 70 वर्षांची महिला, पापनस (ता. माढा) येथील 35 वर्षीय पुरुष, बालाजी कॉलनी, सोलापूर रोड, बार्शी येथील 52 वर्षीय पुरुष, श्रीपत पिंपरी (ता. बार्शी) येथील 80 वर्षांची महिला यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 205 इतकी झाली आहे. अद्यापही दोन हजार 905 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर चार हजार 280 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अद्यापही 152 जणांचा अहवाल प्रलंबित आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज