टीम मंगळवेढा टाईम्स । सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण झाली होती; पण आता पुन्हा सोन्याच्या दरात 730 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्ली बाजारात सोने 730 रुपये प्रतिग्रॅम, तर चांदी 1 हजार 520 रुपये प्रतिकिलोग्रॅमने वाढली आहे. त्यामुळे सोन्याचा दर 53 हजार 691 रुपयांवर पोहोचला, तर चांदी 1 हजार 520 रुपयांनी वाढून 70 हजार 500 रुपये प्रतिकिलो झाली आहे. Gold price rises by Rs 730 again
गेल्या आठवड्यात सोन्याचे दर 52 हजार 961 रुपयांवर आले होते. त्याआधी सोन्याने प्रतितोळे 58 हजार रुपयांचा उच्चांकी दर गाठला होता. आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात घसरण झाल्याने सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाली आहे.
परंतु, शनिवारी पुन्हा सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. पुढील काही दिवस सोन्याचे दर 52 हजार 300 ते 53 हजार रुपयांपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज