टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील ग्रामीण भागातील अहवाल आज प्राप्त झाला आहे. त्यामध्ये आज नव्याने 174 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज 1 हजार 282 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 108 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 174 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय आज सात जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. Solapur rural new 174 corona patients found seven killed
आज ‘या’ भागात आढळले नवे कोरोनाबाधित रुग्ण
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, बोराळे, मरवडे, सलगर बुद्रुक,सांगोला तालुक्यातील चिकमहूद, ढाळेवाडी, महुद शिवणे, वाडेगाव,माढा तालुक्यातील बेंबळे, कुर्डूवाडी, मिटकलवाडी, परिते, रांझणी, श्रीरामनगर माढा,
मोहोळ तालुक्यातील खवणी, मोरवंची, पाटकूल, समर्थनगर, शिरापूर, वाफळे, बार्शीतील आडवा रस्ता, अलीपूर रोड, बारंगुळे प्लॉट, कोर्टाच्या पाठीमागे, भीमनगर, चारे, चिखर्डे, दत्तनगर, गाडेगाव रोड, हनुमान रोड, कापसेवाडी, खडकोणी, कोरफळे, कुर्डुवाडी रोड, परांडा रोड, रिंग रोड, सनगर गल्ली, शेळगाव, श्रीपत पिंपरी, सिद्धार्थनगर, झाडबुके मैदान,
माळशिरस तालुक्यातील अकलूज, दहिगाव, महाळूंग, माळीनगर, मांडवे, संग्रामनगर, उघडेवाडी, यशवंतनगर, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी व डोणगाव, दक्षिण सोलापुरातील भंडारकवठे, बोरामणी, फताटेवाडी, हत्तरसंग, नवीन विडी घरकुल, अक्कलकोट मधील समर्थ नगर, तहसील ऑफिसजवळ
पंढरपुरातील अनिल नगर, बादलकोट, भटुंबरे रोड, भोसे, चंद्रभागा घाट, चौफाळा, दाळे गल्ली, फुलचिंचोली, घोंगडे गल्ली, गुरुकृपा हौसिंग सोसायटी, हरिदास वेस, इसबावी, जुनी पेठ, कडवे गल्ली, कासेगाव, काशीकापड गल्ली, खर्डी, कोळी गल्ली, क्रांतीचौक, मुंडेवाडी, नेमतवाडी, पोलिस लाईन, रोपळे, सरकोली, शिवरत्न नगर, शेळवे, सोनाजी महाराज मठ, सोनके, सब जेल, तन्हाळी, तारे गल्ली व उमडे गल्ली या ठिकाणी नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
आज ‘या’ भागातील सात जणांचा मृत्यू
करमाळ्यातील बागवान नगर येथील 48 वर्षाची महिला, उपळाई रोड बार्शी येथील 45 वर्षांचे पुरुष, गांधी रोड पंढरपूर येथील 54 वर्षाची महिला, उत्पाद गल्ली पंढरपूर येथील 70 वर्षाची महिला, फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील 53 वर्षाचे पुरुष, माढा तालुक्यातील रिधोरे, येथील 70 वर्षाची महिला, तांदुळवाडी येथील 80 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ग्रामीणमध्ये 220 इतकी झाली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात आत्तापर्यंत सात हजार 878 जण बाधित झाले आहेत. अद्यापही दोन हजार 860 जण रुग्णालयात उपचार घेत असून चार हजार 798 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज