टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथे पाण्याच्या कॅनॉलमध्ये पडून एका 52 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून मंगळवेढा पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
दरम्यान,उत्तम बिराप्पा हेगडे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत उत्तम हेगडे हे दुपारी 3.00 वा. मरवडे गावात किराणा बाजार आणणेकामी सायकल घेवून गेले होते.
त्यादिवशी ते घरी परत आले नसल्याने सर्वत्र त्यांचा शोध घेतला.दि.6 रोजी सकाळी 9.15 वा.मंगळवेढा तळसंगी रोडवर असलेल्या
कॅनॉलमध्ये पाण्यात पडून ते मयत अवस्थेत मिळून आले असल्याचे परशुराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल नवले हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज