टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव व मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाच्या वतीने नवरात्रोत्सवात शासनाने १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रियांसाठी आरोग्य तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे.
त्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य मंजुळा कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सुरक्षित व सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबविले जात आहे.
या कार्यक्रमाला दामाजीचा संचालक दिगंबर भाकरे, डॉ.शरद शिर्के, डॉ.प्रीती शिर्के,डॉ.अमोल चव्हाण, डॉ.अभिजीत साळुंखे, डॉ.भाऊसाहेब जानकर, डॉ.दत्तात्रय शिंदे, डॉ.देशमुख , डॉ.हजगी यांच्यासह
आंधळगाव केंद्रातील आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , परिचारिका उपस्थित होते.या अभियानातून २१० महिलांची तपासणी करण्यात आली.
राज्यात माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी होत असले तरी गरोदरपणात महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अत्यल्प आढळत असते.
ग्रामीण आणि अतिदुर्गम भागात तर महिलांच्या आरोग्य तपासणीकडे कुटुंबाकडून बऱ्याचदा दुय्यम स्थान देण्यात येत असते.
प्रामुख्याने घरातील स्त्री आरोग्यदृष्ट्या सशक्त असेल तर घर सुरक्षित ही संकल्पना घेऊन नवरात्रोत्सवाच्या काळात ही योजना राबविण्यात येत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र , आरोग्य उपकेंद्र येथे शिबीर घेऊन १८ वर्षावरील सर्व महिलांची तपासणी करून घ्यावी या तपासणीला कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून मोफत तपासणी होणार आहे.
उपचारही महात्मा फुले जन आरोग्य योजना , प्रधानमंत्री मातृवंदन योजने अंतर्गत केले जाणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी जानकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मनोहर पाटील यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज