टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील एका गावात बेकायदेशीर गैर कायद्याची मंडळी जमवून दिवाणी न्यायालयात खटला दाखल असतानाही शेतजमीणीचा जेसीबीच्या साह्याने बांध फाेडून
न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जेसीबी चालकासह दहाजणाविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी यातील फिर्यादी, निंबोणी येथील संगीता वगरे हे दिनांक २२ रोजी सायंकाळी ६ वाजता त्या घरी असताना सासु राधाबाई वगरे यांनी येऊन सांगितले.
आपल्या रानात जेसीबी घेऊन बंडू ढगे आला आहे ताे शेतात काहीतरी करत आहे.
दरम्यान फिर्यादी एकटीच शेतात गेली असता जेसीबी चालक लक्ष्मण माळी हा शेतात जेसीबी घेऊन आल्याचे दिसल्यावर फिर्यादीन जेसीबी चालकाला काय करताेस आमच्या जमिनीचा मंगळवेढा दिवाणी न्यायात खटला चालू आहे.
आमच्या शेतात जेसीबी घेऊन का आला असे म्हणाले असता तू कोण सांगणार असे चालक म्हणाला. मला आंकुश माळी, तुकाराम माळी यानी तुझा शेताचा बांध काढायला सांगीतलाय
तु बाजूला सरख म्हणून गट नंबर ५२३/२ मधील पश्मिमकडील उत्तर बाजुचा बांध आराेपी आंकुश माळी, तुकाराम माळी, जेसीबी चालक लक्ष्मण माळी, रमजान तांबोळी, हनुमंत पाटील, बाबू गोडसे ,श्रीमंत पाटील,
रंगनाथ बंडगर, रेवणसिध्द पाटील , बंडू ढगे या दहा जणांनी जेसीबीच्या साह्याने बांध फोडून टाकला असल्याचे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज