टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्य शासनाने बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान ५० अन् जास्त जास्त ७५ करण्यासह
अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचे ७७ ऐवजी ७५ गट होतील.
पंचायत समितीचे १५४ ऐवजी १५० गण असतील गट, गणांची संख्या कमी झाल्याने गट, गणांच्या रचनासह आरक्षणामध्ये बदल होणार आहे.
गेल्या आठवड्यात आरक्षण सोडतीमुळे संधी हुकलेल्या काहींना पुन्हा संधी मिळण्यासह, काहींना ती गमावावी लागू शकते.
ग्रामीण भागातील लोकसंख्या घटत असल्याने गट, गणांची संख्या सुधारीत करण्यात निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत ५५ ते ८५ पर्यंत गटांची संख्या वाढवण्याचा निर्णय झाला होता.
त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेतील पूर्वीची ६८ सदस्य संख्येत १९ सदस्यांची वाढ होऊन ७७ गट तयार झाले होते. तसेच, पंचायत समितीचे १५४ गण आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्याने २१ मार्च पासून त्या संस्थांवर प्रशासकीय कारभार आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मंजूर झाल्याने गट आणि गणांची आरक्षण सोडत झाली होती. त्यावर नागरिकांच्या हरकती घेण्यात आल्या.
५ ऑगस्ट अंतीम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे. बुधवारी शासनाच्या निर्णयामुळे झेडपीचे दोन गट, पंचायत समितीचे चार गण कमी होणार आहेत.(स्रोत:दिव्य मराठी)
काहींना संधीची शक्यता , काहींची झाली कोंडी
टेंभुर्णी , कुंभारीचे प्रस्ताव दाखल
टेभुर्णी नगरपंचायत , कुंभारी नगर परिषद करण्याचे प्रस्ताव शासनाकडे दाखल आहेत. जिल्हा परिषद गट रचनांमध्ये टेंभुर्णी व कुंभारी गटांची समावेश आहे. दोन गट कमी करावे लागणार असल्याने, त्या गटांना वगळले जाईल , अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन गट कमी झाल्यामुळे संपूर्ण आरक्षण सोडत पुन्हा नव्याने काढावी लागणार आहे.
गट – गणात पर्यायांचा शोध
आरक्षण सोडतीमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व ७ गट महिलांसाठी राखीव झाले . माजी सदस्य , पदाधिकाऱ्यांचे अनेक गट आरक्षित झाल्याने सुरेश हसापुरे , विक्रांत पाटील , विजयराज डोंगरे , बळीराम साठेंसह अनेकांची कोंडी झाली . काहींनी गणांतून लढवण्याची तयारी सुरु केली तर काही इच्छुकांनी गटांत स्वतः ऐवजी पत्नी किंवा इतर पर्याय शोध तयारी केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज