टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात मुदत संपलेल्या चार ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ४२ जागेसाठी २१२ अर्ज दाखल झाले आहेत.
जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत व नव्याने स्थापन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक संगणक प्रणालीद्वारे प्रत्यक्ष राबविण्यात येत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील मुदत संपुष्टात आलेल्या चार ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रीया सुरु असून मंगळवारी दि.१९ रोजी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता.
संत चोखामेळानगर ग्रामपंचायतमध्ये चार प्रभागात एकूण १३ सदस्य असून यासाठी ५४ अर्ज दाखल झाले आहेत.
संत दामाजीनगर ग्रामपंचायतच्या पाच प्रभागात एकूण १५ सदस्य असून ७४ अर्ज दाखल झाले आहेत. धर्मगाव ग्रामपंचायतीत तीन प्रभागातून ७ सदस्य असून ३३ अर्ज दाखल झाले आहेत.
सलंगर खुर्द ग्रामपंचायतचे तीन प्रभागात सात सदस्य असून आतापर्यंत ५१ अर्ज दाखल झालेत. मंगळवारी अखेरचा दिवस असल्यामुळे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास मोठी गर्दी झाली होती.
आज बुधवारी सकाळी ११ पासून तीन पर्यंत छाननी होईल तर उद्या शुक्रवारी ( २२ ) दुपारी तीनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, त्यानंतर निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द होणार आहे.
चार ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडे पाचपर्यंत मतदान होणार आहे.
पाच ऑगस्टला मतमोजणी होणार असून ११ वाजेपर्यंत निकाल जाहीर होणार आहे असे तहसीलदार स्वप्निल रावडे, निवडणूक विभाग नायब तहसीलदार सुधाकर धाईजे, एस एच जाधव, डी एस इंगोले, जी ए वाघमोडे,
एस एच कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे उमाकांत मोरे निवडणूक प्रक्रीया राबवित आहेत.
बिनविरोध ग्रामपंचायत काढण्यासाठी दोन गावात बैठका सुरू असून बिनविरोधची चर्चा लांबणीवर जात असली तरी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होणार आहे. पॅनेल प्रमुखांना सदस्य निवडीसाठी कसरत करावी लागत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज