टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष पदासाठी शशिकांत चव्हाण यांचे नाव अग्रेसर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
शशिकांत चव्हाण यांच्याकडे सध्या जिल्हा संघटन सरचिटणीस ही जबाबदारी आहे. पक्षाच्या शिस्तबद्ध कामाचा दांडगा अनुभव पाठीशी असणारे चव्हाण विद्यार्थी दशेपासून चळवळीत काम करत आले आहेत.
विद्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले असल्याने त्यांना संपूर्ण पक्षीय कामाचा व शिस्तीचा अनुभव आहे.
भाजप मध्ये त्यांनी यापूर्वी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष, युवा तालुकाध्यक्ष, भाजप मंगळवेढा तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष व सध्या संघटन सरचिटणीस अशी पदे घेऊन चिकाटीने काम केले आहे.
तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकी वेळेस त्यांच्याकडे नागठाण मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जवाबदारी होती. मंगळवेढा शहरामध्ये अंबिका उद्योग समूहाच्या माध्यमातून कित्येक तरुणांना रोजगार देणारे व रोजनार निर्मिती करण्याचे काम करणारे म्हणून देखील त्यांना ओळखले जाते.
भाजप मध्ये संघटनात्मक काम करत सर्वांना सोबत घेऊन सर्वांची सांगड घालून काम करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आहे. नवे जुने कार्यकर्ते मिसळून सर्वांना योग्य न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावाची पसंती दिसून येत आहे.
जुना व पक्षशिस्त चेहरा असल्याने प्रदेश स्थरावर देखील चव्हाण यांच्या नावाची पसंती असून जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव अग्रेसर आहे.
भाजपच्या कार्यपद्धती मधील व्यक्ती जिल्हाध्यक्ष होणार असेल तर त्याचा फायदा जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला होणार असल्याने सर्वांजण चव्हाण यांच्या नावाची शिफारस देखील पक्षश्रेष्ठीं कडे करत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार यांच्या माध्यमातून देखील शशिकांत चव्हाण यांचे नाव अग्रेसर आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज