mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राज्यात आजपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त, भाजप-शिंदे सरकारचा सामान्यांना दिलासा; पाहा काय आहेत नवे दर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 15, 2022
in राज्य
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; आज पुन्हा दर कडाडले; एक लिटरसाठी किती रुपये मोजाल?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रातील शिंदे-भाजप सरकारने मोठा दिलासा देत गुरुवारी पेट्रोल लिटरमागे पाच रुपयांनी, तर डिझेल लिटरमागे तीन रुपयांनी स्वस्त केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रपरिषदेत ही घोषणा केली. पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करत सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

आजच्या निर्णयामुळे मुंबईसह राज्यात बहुतांश ठिकाणी पेट्रोल १०६.८० रुपये, तर डिझेल ९४.८० रुपये प्रती लिटरवर आले. नवे दर गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले.

फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी सातत्याने व्हॅट कमी करण्याची मागणी केली होती; पण महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला नव्हता.

शिंदे-फडणवीस यांनी सत्ता येताच पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती, गुरुवारी ती अमलात आणली.

केंद्र सरकारने मे महिन्यात उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल व डिझेल दरात मोठी घट झाली होती. त्याच्या दोन दिवसांनी तत्कालीन राज्य सरकारनेही व्हॅट कमी केल्याचे सांगितले होते;

पण त्याचा परिणाम दरांवर दिसला नाही. त्यामुळे २२ मेपासून पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर होते.

त्यावेळी राज्य सरकार पेट्रोलवर ३० रुपये ८२ पैसे, तर डिझेलवर २१ रुपये २६ पैसे प्रती लिटर व्हॅट आकारत होते. त्यामध्येच आता घट झाली आहे. विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र या इंधन स्वस्ताईवर टीका केली.

सरकारवर ६ हजार कोटींचा बोजा
पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सरकारवर ६ हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

मात्र, हा महसूल गेला तरी विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची सरकार काळजी घेईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पेट्रोल व डिझेल दर हे चार प्रकारच्या शुल्क वसुलीनंतर ग्राहकांना लागू होतात. जसे तेल शुद्धिकरण कंपन्या मूळ दराने पंपमालकांना इंधन देतात. त्यानंतर त्यावर केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क (पेट्रोलसाठी १९.९०, डिझेलसाठी १५.८०) लावले जाते.

या दोन्हीच्या बेरजेनंतर त्यावर पंपमालकांचे कमिशन असते. अखेरीस राज्य सरकारचा व्हॅट लागतो. राज्य सरकारकडून आतापर्यंत पेट्रोलवर ३० रुपये ८२ पैसे व डिझेलवर २१ रु. २६ पैसे व्हॅट आकारले जात होते. हा व्हॅट आता अनुक्रमे २५ रुपये ८२ पैसे व १८ रुपये २६ पैसे होईल.

आणखी कोणते निर्णय?

१९७५च्या आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगाव्या लागलेल्या बंदीवानांना पूर्वीप्रमाणे मानधन सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा दहा हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस, पतीस पाच हजार रुपये मानधन,

तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा पाच हजार रुपये, तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस, पतीस दोन हजार ५०० रुपये इतके पूर्वीप्रमाणेच मानधन देण्यात येईल.(स्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पेट्रोल डिझेल दर कमी

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 10, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
Next Post
चिंता वाढली! राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद, अशी आहे राज्याची स्थिती

सावधान! भारतात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; जाणून घ्या काय आहेत लक्षणं

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढा पोलिसांना संभाजी ब्रिगेडचे थेट आव्हान; अवैध धंदे रोखा, नाहीतर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

August 10, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश शेती दौऱ्यावर जाण्याची संधी; कृषी विभागाकडून अर्ज करण्याचे इच्छूक शेतकऱ्यांना आवाहन

August 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मंगळवेढ्यात तुमची जमीन, प्लॉट किंवा घर विकायचंय? मिळवा सर्वोत्तम किंमत आणि १००% सुरक्षित व्यवहार; पारदर्शकता आणि विश्वासाचे एकमेव नाव ७/१२ डेव्हलपर्स; 9970766262 व 9890605962 आजच संपर्क साधा

August 9, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा