टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा हाहाकार वाढत असून आज पुन्हा 265 नव्या रुग्णांची भर पडली आहे.त्याचबरोबर आठ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.( Solapur rurual new 265 patients positive Eight victims )
आतापर्यंत बाधितांची संख्या नऊ हजार 211 एवढी झाली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दोन हजार 473 इतकी असून रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्यांची संख्या सहा हजार 480 एवढी आहे.
आज एकूण 1 हजार 597 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 332 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 265 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज ‘या’ भागात आढळले नवे रुग्ण
मंगळवेढ्यातील आंधळगाव, बोराळे, धर्मपुरी, देगाव, दुर्गामाता नगर, गोवे गल्ली, कारखाना रोड, मित्र नगर, मुजावर गल्ली, नागणे प्लॉट, नंदेश्वर, वनराई कॉलनी, सांगोल्यातील अल रैननगर, जवळा, कोष्टी गल्ली, मुजावर गल्ली, वासुद रोड, मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी, कामती बुद्रुक, कोरवली, कुरुल, पाटकुल,
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव, समर्थनगर, किणीवाडी, मार्केट यार्ड, स्टेशन रोड, बार्शीतील अलीपूर रोड, शहर पोलिस स्टेशन, गाडेगाव रोड, गाताचीवाडी, घारी, घोडके प्लॉट, जावळे प्लॉट, कासारवाडी, कसबा पेठ, कव्हे, खांडवी, मलिक चौक, मंगळवार पेठ, मल्लिकार्जुन मंदिराजवळ, सावळे गल्ली, एसबीआय, शेंद्री, सोलापूर रोड, तुळजापूर रोड, उक्कडगाव, उपळाई रोड, वैराग, यळंब,
करमाळ्यातील जिंती, केम, कृष्णाजी नगर, मंगळवार पेठ, राशिन पेठ, संभाजीनगर, सावडी, शिवाजीनगर, तरटगाव, तेली गल्ली, माढा तालुक्यातील आढेगाव, केवड, कुंभेज, कुर्डू, कुर्डूवाडी, रांझणी, रिधोरे, उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमंगल कारखाना बीबीदारफळ, तिऱ्हे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बिरनाळ, कुंभारी, नवीन विडी घरकुल,
पंढरपुरातील आंबेचिंचोली, अंबिका नगर, अनिल नगर, कडवे गल्ली, भंडीशेगाव, भोसले चौक, चौफाळा, कॉलेज रोड, डाळे गल्ली, देगाव, एकलासपूर, गादेगाव, गोपाळपूर, गुरुदेव नगर, इसबावी, जुनी माळी गल्ली, करकंब, करोळे, कासेगाव, खर्डी, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, महावीर नगर, मनिषा नगर, माऊली नगर, नवी पेठ, काळा मारुती जवळ, रुक्मिणी नगर, समता नगर, संभाजी चौक, संत पेठ, सरगम चौक, शेळवे, स्टाफ क्वार्टर, उमदे गल्ली, वाडीकुरोली, येळे वस्ती,
माळशिरस तालुक्यातील अकलूज, बोरगाव, चाकोरे, चौंडेश्वरवाडी, देशमुख वाडी, महाळूंग, माळेवाडी, माळीनगर, मोटेवाडी, श्रीपूर, वेळापूर, यशवंनगर याठिकाणी नवे कोरोनोबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
आज ‘या’ गावातील रुग्णांचा मृत्यू
माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथील 40 वर्षाचे पुरुष, संगम येथील 63 वर्षाची महिला, बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, उपळाई रोड बार्शी येथील 28 वर्षाचे पुरुष, कासरवाडी येथील 65 वर्षांचे पुरुष, माढा तालुक्यातील चिंकहिल येथील 56 वर्षांचे पुरुष, एसटी कॉलनी करमाळा येथील 84 वर्षांचे पुरुष गादेगाव (ता.पंढरपूर) येथील 80 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 258 एवढी झाली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज