टीम मंगळवेढा टाईम्स ।
येणाऱ्या 12 तारखेला विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करून श्री.संत शेतकरी विकास आघाडीला विजयी करा सरकार आमचे आले आता कारखाना कर्जमुक्त होणार असल्याचा विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला आहे.
संत दामाजी कारखाना निवडणूकीच्या प्रचारासाठी त्यांनी बठाण, ब्रम्हपुरी, सिध्दापूर, अरळी, बोराळे, नंदूर, कागष्ट, भाळवणी, निंबोणी, सलगर बु, हुलजंती, गावाच्या प्रचार दौऱ्यत बोराळे येथे बोलत होते.
यावेळी प्रा.येताळा भगत, उपाध्यक्ष आंबादास कुलकर्णी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, प्रदीप खांडेकर, राजेद्र पाटील, बापूराया चौगुले, सचिन शिवशरण, गणेश गावकरे आदी उपस्थित होते.
आ.आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, वीस साखर कारखाने निर्माण व्हावे एवढा माझा उद्योग असून तालुक्यातील शेतकऱ्यांची काळजी असल्याने हा उद्योग भावावर सोपवून या लक्ष घालून साखर कारखान्यातून सभासदाचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे.
कारखान्यावर कर्जाचा डोंगर असताना आमचे संचालक मंडळ सत्तेवर आले.सहा वर्षाच्या काळात एकही हंगाम बंद न ठेवता कारखाना चालवून दाखवला.
बिल देताना थोडे मागेपुढे झाले असेल पण शेतकऱ्याची बिले अदा केली.तरीही मला पराभूत करण्याच्यासाठी सर्वजण एकत्र आले. पण ज्यांनी मला कारखान्याचा अध्यक्ष व आमदार केले.
जो पर्यंत त्यांच्या मनात आहे तो पर्यत मला कोणीही पराभूत करून शकत नाही.तालुक्यात तीन सदस्य असताना मतदाराच्या ताकदीवर जि.प.उपाध्यक्ष पद मिळवले.
माझ्यावर टिका करणारे फोनवर त्यांच्या कामाबाबत बोलताना चांगले बोलतात चांगला कामासाठीचा योग्य सल्ला माझ्याशी न बोलता वृत्तमानपत्रातून, सभेतून देतात.
चुकीच्या पध्दतीने आधार नसलेले बिनबुडाचे आरोप करून टिका करत असले तरी सभासद अशा टीकेला महत्त्व देत नसतात.
विरोधकांनी शेतकऱ्याच्या चुलीत पाणी ओतल्याचा आरोप केला.मी चुलीत पाणी ओतणारा नसून गोरगरीबाची चुल पेटवणारा लोकप्रतिनिधी आहे माझा सभासदावर पुर्ण विश्वास असल्यामुळे त्यांच्या टीकेला मी घाबरणार नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज