टीम मंगळवेढा टाईम्स । चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी आईसह तिच्या नऊ वर्षाच्या चिमुकल्याच्या गळ्यातील दागिने चोरताना त्या चिमुकल्याची आई जखमी झाली. तर नऊ महिन्याचे बाळ मयत झाले असल्याची धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील वांगरवाडी या गावात आज भरदुपारी घडली आहे.
सार्थक स्वानंद तुपे असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी पंचनामा केला असून याबाबत अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. याबाबत माहिती अशी की , बार्शी तालुक्यातील वांगरवाडी या गावांमध्ये राहणारे तुपे कुटुंबावर आज खूप मोठा आघात झाला आहे.
भरदुपारी वांगरवाडी या गावात एका घरात अश्विनी स्वानंद तुपे ही महिला राहत असताना चोरीच्या उद्देशाने दोन इसम तिच्या घरात घुसले आणि त्याच ठिकाणी झोपलेले असलेले नऊ महिन्याचे बाळ सार्थक तुपे यांच्या डोक्यावरील घातलेले टकुचे त्या चोरांनी काढून त्या आईच्या तोंडात कोंबले आणि तिच्या गळ्यातील दागिने आणि मनी मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून घेतले.
तर तेथेच असणारे लहान बाळ सार्थक तुपे या नऊ महिन्याच्या बाळाच्या गळ्यात बदाम असलेले चोरट्यांना दिसले आणि त्यांनी ते गळ्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बदाम ओरबाडून चोरत असताना या नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा गळा चिरला गेला आणि तो मयत झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना घडल्यानंतर तात्काळ बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे शिवाजी जायपत्रे आपल्या सहकारी पोलिसांसह गावात हजर झाले. तसेच यावेळी वांगरवाडी या गावांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे हेही गावात हजर झाले असून गावातील वातावरण शांत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
भर दुपारी घडलेल्या या चोरीच्या घटनांमध्ये लहान चिमुकल्याचा जीव गेला असल्याने बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Solapur barshi Wangarwadi Nine month old baby dies after stealing gold from neck
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज