शहरातून विवाहिता बेपत्ता!
मंगळवेढा शहरातून २३ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली असल्याची तक्रार तीच्या पतीने पोलिसात दिली असून पोलिस त्या बेपत्ता महिलेचा कसून शोध पोलीस घेत आहेत.
यातील २३ वर्षीय बेपत्ता महिला दि.२२ च्या सकाळी ६.०० च्या पुर्वी खबर देणारे यांचे रामकृष्ण नगर येथील राहते घरातून कोणास काही न सांगता घरातून निघून गेली आहे.
तीचे वर्णन अंगाने सडपातळ , रंग गोरा , चेहरा उभट , नाक सरळ , डोळे काळे , उंची ५ फुट , ५ इंच , अंगात नेसणेस निळया रंगाचा ड्रेस , शिक्षण बी.एस्सी झाले असून मराठी , हिंदी भाषा बोलते अशा वर्णनाची तरूणी कोणाच्या निदर्शनास आल्यास पोलिस नाईक तुकाराम कोळी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकिकत अशी,दि.२१ रोजी सायंकाळी ६.०० च्या दरम्यान यातील फिर्यादी यांच्या घरातून बाथरूमला जाते असे सांगून ती राहते घरातून बाहेर पडली.
असून अदयापपर्यंत मिळून आली नसून कोणीतरी फूस लावून पळवून नेले असल्याची तीच्या वडीलांनी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरूध्द तक्रार दाखल केली आहे.
सदर मुलीचे वर्णन रंग सावळा,उंची १६५ सेंमी, नाक सरळ, अंगाने सडपातळ , रंगात पिवळसर रंगाचा फ्रॉक, कानात सोन्याच्या रिंगा, पायात पैंजण आहे.याचा तपास पोलिस हे.कॉ.घोळसगाव हे करीत आहेत.
सलगर येथून अल्पवयीन मुलीस पळविले , गुन्हा दाखल
मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथून एका १६ वर्षीय मुलीला अमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.१७ रोजी सलगर येथून दुपारी १२.०० च्या दरम्यान राहते घरातून १६ वर्षीय मुलगी बाहेर पडली ती रात्री उशीरापर्यंत घरी परतली नाही.
अल्पवयीन असल्याने तीला कोणीतरी अमिष दाखवून पळवून नेले असल्याची तक्रार तीच्या वडिलांनी पोलिसांत दिल्यावर अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्णन रंग गोरा , उंची १६५ सेंमी , नाक सरळ , अंगाने सडपातळ , अंगात लाल कलरचा पंजाबी ड्रेस , कानात रिंगा व पायात पैंजण आहे.अधिक तपास पोलिस नाईक क्षिरसागर हे करीत आहेत.
Mangalwedha city woman, two minor girls have gone missing
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज