mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळजनक! सोलापूर जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फुटणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 24, 2022
in सोलापूर
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पळवून नेले जात आहे. असे असताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मूग गिळून गप्प बसले आहेत.

जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेत्यांसाठी जनतेबरोबर गद्दारी करत आहेत. त्यांनी या उजनी पाणी आंदोलनात सहभाग न घेतल्यास त्यांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फोडण्याचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा, उजनी धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी दिला.

उजनी धरणातील पाणी लाकडी – निंबोळी सिंचन योजनेद्वारे इंदापूर आणि बारामती तालुक्यातील गावांना देण्यात येणार आहे. त्यास सरकारची प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे.

ही सिंचन योजना सोलापूर जिल्ह्यावर अन्याय करणारी असल्याने सरकारने ही योजना मागे घ्यावी, यासाठी पंढरपूर – टेंभुर्णी महामार्गावर भोसे चौकात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी खुपसे-पाटील बोलत होते.

लाकडी-निंबोळी सिंचन योजना रद्द करावी या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आल्याने सुमारे 2 तासांहून अधिक काळ पंढरपूर-टेंभुर्णी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

या आंदोलनात उजनी धरण संघर्ष समितीचे माऊली हळणवर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, मोहोळ शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर, लक्ष्मण धनवडे, बळीराजाचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर,

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रणजित बागल, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज गावंधरे, नितीन बागल, स्वाभिमानीचे रायाप्पा हळणवर, समविचारी आघाडीचे बाळासाहेब माळी, महादेव तळेकर, अजय जाधव, शहाजहान शेख उपस्थित होते.

या रास्ता रोको आंदोलनासाठी मारुती कोरके, मोहन तळेकर, संजय तळेकर, नितीन खटके, महेश खटके, गणेश सरडे, सज्जन भोसले, यांच्यासह विविध पक्षांचे नेते, शेतकरी संघटनेचे नेते, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उजनी पाण्याचा हा लढा धनगर समाज तसेच पालकमंत्र्यांच्या विरोधात नाही, तर आपला लढा हा पाणी चोरीच्या विरोधात आहे.

सोलापूर जिल्हावासीयांवर वाईट वेळ आणलेले घड्याळ फोडण्याची वेळ आता आली आहे.

पुणे जिल्ह्यातील धरणातील सगळे पाणी बारामतीला नेले आहे आणि आता उजनी धरणातील पाणी पळवले जात असल्याचा आरोप अतुल खुपसे-पाटील यांनी केला.(स्रोत:पुढारी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 14, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्याच्या विकासासाठी ३ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘या’ कामांना मिळणार गती

April 8, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

April 7, 2026
Next Post
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

महिना दीड लाख पगार असलेल्या सोलापूरच्या दाम्पत्याचा दीड महिन्यात घटस्फोट; कारण वाचून थक्क व्हाल..

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 14, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 14, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा