टीम मंगळवेढा टाईम्स । जगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट समोर आलं आहे. प्रशांत महासागरात ला-निना वादळाचा प्रभाव दिसून येत असल्यानं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणि कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
भारतात 2020 च्या अखेरपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता असून सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
भारतात ला निनाचा प्रभाव दक्षिणेकडील राज्यांत सगळ्यात जास्त दिसून येण्याची शक्यता आहे.
ब्रिटीश शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की 1994 पासून पृथ्वीच्या पृष्ठभागावरून एकूण 28 लाख कोटी टन बर्फ वितळला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, आणि वितळणाऱ्या बर्फामुळे जमीन आणि समुद्रातील तापमानावर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
There will be torrential rains and severe cold in September and October
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज