mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारक समिती कामकाज करण्यापूर्वी बरखास्त; नव्या समितीचे प्रमुख कोण?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 28, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

टीम मंगळवेढा टाईम्स ।

संत बसवेश्वर महाराजांच्या स्मारकासाठी देखभाल दुरुस्तीचे हमीपत्र देणाऱ्या मंगळवेढा नगरपालिकेतील लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांना स्मारक समितीतून बाहेर ठेवण्याचा प्रताप

महाविकास आघाडी सरकारने केल्यामुळे शहरातील नागरिकातून नाराजी व्यक्त झाल्यामुळे अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली स्मारक समिती कामकाज सुरू करण्याआधी बरखास्त केली.

याबाबत राज्याचे उपसचिव मनोज जाधव यांच्या सहीने हा निर्णय पारित करण्यात आला.

देशभर पसरलेल्या बसव प्रेमी नागरिकांमधून जनजागृती करून सरकारवर हे स्मारक व्हावे, यासाठी दबाव आणला व तत्कालीन भाजप सरकारने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.

या समितीने आराखडा तयार करून कृषी खात्याच्या ताब्यातील 35 एकर जमीन त्यामध्ये शंभर फुटी मूर्ती ध्यान केंद्र अभ्यास केंद्र भक्त निवास ग्रंथालय शेतकरी निवास,

बसवेश्वराचे विचार सांगणारे फलक व कृषी पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला.

स्व.आ.भालके यांनी अनेक वेळा विधानसभेत प्रश्न देखील उपस्थित केला. स्मारकासाठी निश्चित केलेल्या कृषी खात्याच्या जागेसाठी नगरपालिकेने देखभाल-दुरुस्ती चे प्रमाणपत्र जोडले नसल्यामुळे हा प्रस्ताव परत आला.

त्यानंतर झालेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिकेने देखभाल दुरुस्तीचे प्रमाणपत्र दिल्यानंतर या स्मारकाला मंजुरी मिळाली.

व गतवर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या स्मारकासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद करण्याची घोषणा केली.

मात्र, घोषणा करण्यापूर्वी नव्या स्मारक समितीची अस्तित्वात आणणे आवश्यक होते. परंतु. तसे न केल्याने स्मारकाचा प्रश्न कागदावरच लटकत राहिला.

आ.समाधान आवताडे यांनी स्मारकाबाबत प्रश्न उपस्थित करून सरकारला याबाबत जाणीव करून दिल्यानंतर जिल्हाधिकाय्रांच्या अध्यक्षतेखाली 34 सदस्यांची नवीन समिती अस्तित्वात आली.

त्यामध्ये राष्ट्रवादीचे स्थानिक नेते भगीरथ भालके नगरपालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा त्यामध्ये समावेश असणे आवश्यक होते.

परंतु, पालिकेतील लोकप्रतिनिधी चा कार्यकाल संपला असला तरी मुख्याधिकाऱ्यांना त्यात समावेश करणे आवश्यक होते.

परंतु, महाविकास आघाडी सरकारने तसे न केल्यामुळे देखभाल दुरुस्तीचे हमीपत्र देणाऱ्या नगरपालिकेचा स्मारक समितीत समावेश नसेल

तर नगरपालिकेने याबाबत का जबाबदारी स्वीकारावी, असा प्रश्न उपस्थित करून सरकार बद्दल नाराजीचा सूर व्यक्त झाल्यानंतर अखेरीस महाविकास आघाडी सरकारने हे स्मारक समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे नव्या स्मारक समितीचे प्रमुख कोण? आणि समिती मध्ये कोणाचा समावेश होणार? याची उत्सुकता लागली असली तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार याबाबत विचारणा होऊ लागली.(स्रोत:सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बसवेश्वर स्मारक

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
Next Post
Breaking! शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव ताड यांचे निधन; उद्या होणार अंत्यसंस्कार

Breaking! शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव ताड यांचे निधन; उद्या होणार अंत्यसंस्कार

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..