mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विठ्ठल मंदिर दर्शनासाठी तातडीने उघडावे अन्यथा तीव्र आंदोलन करणार : आनंद चंदनशिवे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
विठ्ठल मंदिर दर्शनासाठी तातडीने उघडावे अन्यथा तीव्र आंदोलन करणार : आनंद चंदनशिवे

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल – रुक्‍मिणीचे मंदिर कोरोनामुळे गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी तातडीने उघडावे; अन्यथा कोणत्याही परिस्थितीत वारकऱ्यांसोबत आंदोलन केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळीच लक्ष घालून मंदिर उघडावे, अशी मागणी करत, वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेना व विविध वारकरी संघटना आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा सो.म.न नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केली.


लॉकडाउन पासून पंढरपूचे श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर बंद आहे. मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेनेने केली आहे. याच मागणीसाठी 31 ऑगस्ट रोजी विठ्ठल मंदिरासमोर अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लाखो वारकरी आंदोलन करणार आहेत.त्या पार्श्र्वभूमीवर मंगळवेढा येथील  सोलापूर रोडवरील नवनाथ महाराज मठ येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

चंदनशिवे म्हणाले, लॉकडाउनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून पंढरपूरचे विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर बंद आहे. बंदमुळे येथील व्यापारी आणि छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत.


राज्यात दारूची दुकाने आणि मॉल उघडण्यास सरकारने विनाअट परवानगी दिली आहे; परंतु धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली जात नाही. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी येत्या 31 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विविध वारकरी संघटनांच्या वतीने पंढरपुरात आंदोलन केले जाणार आहे.

आंदोलनाला विविध वारकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनामध्ये राज्यभरातील सुमारे एक लाख वारकरी आणि भाविक सहभागी होणार आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी काल जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीवर आम्ही बहिष्कार टाकला आहे. आता ही आमची निकराची लढाई आहे. आता थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल.असे मत व्यक्त केले.

सदर आंदोलनाला अखिल भाविक वारकरी मंडळाचे सोलापूर जिल्हा सह अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांनी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह,भ प सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पाठिंबा असल्याचे सांगितले.


यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे सह जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, नवनाथ महाराज मठाचे मठाधिपती बंडोपंत हेटकळे महाराज, जिल्हा निरीक्षक बबन शिंदे, वंचित चे जिल्हा महासचिव धनाजी सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक माने ,तालुकाध्यक्ष वैभव भंडारे ,शहराध्यक्ष सोमनाथ ढावरे, जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा युवाअध्यक्ष रघुनाथ चव्हाण, परमेश्वर शेजाळ, भारत  शिंदे, सिद्धार्थ लोकरे,ब्रह्मदेव वाघमारे, समाधान राजवर्धन,अनिल सोनवणे ,बाळू वाघमारे, आप्पा बरकडे अंकुश शेंबडे ,सतीश लोकरे तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ ढावरे यांनी केले तर प्रास्ताविक अशोक माने यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनिल सोनवले यांनी मानले.

बहुसंख्येने वारकरी आंदोलनात सहभागी होणार : ज्ञानेश्वर भगरे

करोना संसर्गामुळे गेल्या चार पाच महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे याचा फटका सर्वांना बसला आहे. राज्यात मिशन बिगिन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असेल तरी धार्मिक स्थळांना आणि सण- उत्सवांना तितकासा दिलासा मिळाला नाही यंदा आषाढीवारी प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यात आली आषाढी याञेदिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली  होती.त्यामुळे समस्त वारकरी संप्रदाय वर्ग नाराज आहे.तरी ३१ रोजी पंढरपूचे श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर प्रवेश आंदोलनास अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बहुसंख्येने वारकरी आंदोलनात सहभागी होणार.

               

-ज्ञानेश्वर भगरे

सहजिल्हाध्यक्ष, अखिल.भाविक.वारकरी मंडळ.सोलापूर

Vitthal temple should be opened immediately for darshan, otherwise there will be intense agitation: Anand Chandanshive

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
खुशखबर सोन्याच्या दरात पुन्हा घसरण! तब्बल एवढ्या हजारांनी झाले स्वस्त

खुशखबर सोन्याच्या दरात पुन्हा घसरण! तब्बल एवढ्या हजारांनी झाले स्वस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 6, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा