टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर व तालुक्यातील वीज ग्राहकांना त्रास देण्याचा सपाटा महावितरणने कायम ठेवला असून रात्रीच्या वेळी भारनियमन सुरु केल्यामुळे होणाऱ्या भारनियमन काळातील चोरीच्या घटनेची जबाबदारी महावितरणची राहील असा इशारा शहरातील नागरिकांनी महावितरणला दिला.
कोळसा टंचाईचे कारण सांगून महावितरणने शहर व ग्रामीण भागात मनमानी पद्धतीने भारनियमन सुरू केले असतानाच दिवसा बरोबर आता रात्री 12 ते 2.30 दरम्यान भारनियमन सुरू केले आहे.
यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दुकाने बंद असल्यामुळे भारनियमनामुळे अंधारांचे साम्राज्य असते शिवाय गल्लोगल्ली देखील अंधार पडल्यामुळे चोरट्यांना चोरीच्या घटना करणे सहज शक्य होत आहे.
आणि चोरीनंतर चोरांना पळून जाणे देखील सुलभ होत आहे त्यामुळे या पुढील काळात भारनियमनाच्या वेळी चोरीच्या घटना झाल्यास त्याची जबाबदारी महावितरणची राहील.
मध्यरात्री चोरट्यांना चोरीच्या घटना करणे सहज शक्य होईल अशा पद्धतीने भारनियमन सुरू केले या अनपेक्षित भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी उष्माघातामुळे वयोवृद्ध, लहान मुलांना बरोबर आजारी रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वास्तविक पाहता भारनियमन करावयाचे असेल तर दिवसाच्या वेळा निश्चित करून करण्यास हरकत नाही मात्र रात्रीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने भरणे बंद करून नागरिकांना त्रास देण्याचा सपाटा लावला आहे.
त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यानी मंगळवेढ्यातून कोण विचारणार नाही त्यामुळे आपल्या सोयीने भारनियमन करू अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे.
रात्रीचे भारनियमन रद्द करावे या मागणीवर आज देण्यात आलेल्या निवेदनावर पक्षनेते अजित जगताप,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष संभाजी घुले,भारत नागणे,राहुल सावंजी,ज्ञानेश्वर भगरे, हर्षद डोरले,मुजम्मिल काझी, प्रशांत यादव, प्रदीप खवतोडे,प्रवीण खवतोडे, सोमनाथ बुरजे,सुभाष भंडारे शरद हेंबाडे,ज्ञानेश्वर कौडूभैरी यांच्या सह्या आहेत.
रात्रीचे भारनियमन रद्द करण्याबाबत महावितरणने अंमलबजावणी व्हावी न केल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर शहरातील नागरीका बरोबर जन आंदोलन उभा करू : अजित जगताप पक्षनेते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज