mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारताने उडवला श्रीलंकेचा धुव्वा; फक्त ३ दिवसातच १ डाव आणि २२२ धावांनी जिंकला सामना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 6, 2022
in मनोरंजन
भारताने उडवला श्रीलंकेचा धुव्वा; फक्त ३ दिवसातच १ डाव आणि २२२ धावांनी जिंकला सामना

टीम मंगळवेढा टाईम्स। 

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत हा सामना खेळवला गेला.

यजमान भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी पाहुण्या श्रीलंकेवर १ डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला आहे आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात भारताच्या ५७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात १७४ धावांवरच गारद झाला. परिणामी भारताने श्रीलंकेला फॉलोवॉन दिला. मात्र श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावातही १७८ धावाच करूच शकला.

असा झाला भारत वि. श्रीलंका सामना
भारत आणि श्रीलंकेतील पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी निवडली होती. भारताकडून पहिल्या डावात अष्टपैलू रविंद्र जडेजा याने सर्वाधिक धावा केल्या.

त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २२८ चेंडूत ३ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने नाबाद १७५ धावा चोपल्या. त्याच्या साथीला अष्टपैलू आर अश्विननेही खालच्या फळीत तुफानी ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली.

तत्पूर्वी डावाच्या सुरुवातीला मधल्या फळीत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने ९६ धावा फटकावल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हनुमा विहारीनेही ५८ धावांनी संथ खेळी केली. भारतीय संघाने ५७४ धावांवर डाव घोषित केला.

भारताच्या भल्यामोठ्या ५७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला २०० धावाही करता आल्या नाहीत. फिरकी अष्टपैलू जडेजाने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दम दाखवत श्रीलंकेला कमी धावांवर रोखले. त्याने श्रीलंकेच्या पहिल्या डावात १३ षटके गोलंदाजी करताना ४१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.

तसेच जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले. या डावात श्रीलंकेकडून एकटा पथुम निसांका अर्धशतक करू शकला. तो ६१ धावांवर नाबाद राहिला. अशाप्रकारे ६५ षटकांमध्ये १७४ धावांवर सर्वबाद झालेल्या श्रीलंकन संघाला भारताने फॉलोअप दिला.

दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाने एकाकी झुंज दिली. परंतु तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. तो दुसऱ्या डावात ८१ चेंडूंमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ५१ धावा करत नाबाद राहिला.

या डावात भारताकडून फिरकीपटू आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. हा रोहित शर्माचा भारताचा कसोटी कर्णधार म्हणून पहिला विजय होता.

यानंतर उभय संघातील दुसरा आणि शेवटचा सामना १२ ते १६ मार्चदरम्यान बंगळुरू येथे होणार आहे.(स्रोत:महा स्पोर्ट्स)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: टीम इंडिया

संबंधित बातम्या

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढणार? मोदींच्या सल्लागार परिषदेचा मोठा अहवाल; पण ‘या’ महिलांसाठी चिंतेची बातमी

July 10, 2026
​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

July 6, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​सणाच्या नावाखाली अश्लीलता! मंगळवेढ्यात विनापरवाना महिलांचे डान्स प्रोग्राम आयोजित करणाऱ्या ७ जणांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

July 1, 2026
कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

July 1, 2026
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

हे यमराजा, उद्या आमच्या बायका येतील पण…;  वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नक्की काय घडलं? पुरुषांनी फोडला हंबरडा; ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात आहे?

June 29, 2026
३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

June 15, 2026
Next Post
काळजी घ्या! मंगळवेढ्यात ऊस ताेड कामगाराचा फडात चक्कर येऊन रहस्यमयरित्या मृत्यू

काळजी घ्या! मंगळवेढ्यात ऊस ताेड कामगाराचा फडात चक्कर येऊन रहस्यमयरित्या मृत्यू

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..