टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ नाफेड महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दि.१७ फेब्रुवारी पासून हमीभाव हरभरा (चना)
खरेदी केंद्राच्या ऑनलाइन नाव नोंदणीची मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयामध्ये सुरुवात सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती चेअरमन सिद्धेश्वर अवताडे यांनी दिली आहे.
या खरेदी केंद्रामुळे मंगळवेढा तालुका व इतर तालुक्यातील सर्व हरभरा (चना) उत्पादक शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ कार्यालयाच्या विभागाकडून एस.एम.एस प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तुर विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर आणायची आहे.
त्यानंतर विक्री केलेल्या तुरीची रक्कम ऑनलाइन शेतकऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे. चालू वर्षी हरभरा (चना) या धान्यासाठी आधारभूत किंमत ५ हजार २३० रुपये आहे.
येताना ‘ही’ कागदपत्रे घेऊन या
नोंदणीसाठी सण २०२१-२०२२ च्या हरभरा (चना) या पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक ची स्पष्ट दिसत असणारे झेरॉक्स व मोबाईल नंबर ची आवश्यकता आहे.
अधिक माहितीसाठी येथे करा संपर्क
खरेदी केंद्राच्या अधिक माहितीसाठी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शंभू नागणे ९४०५२१४५९५, मच्छिंद्र कोंडुभैरी ९८९०८३१९३४ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज