बाळासाहेब झिंजुरटे । गैरकायदयाची मंडळी जमवून विनाकारण मारहाण करून तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देणाऱ्या नऊ जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास रा.बोधगीरे वस्ती कोळा ता.सांगोला येथे घडली. फिर्यादी संगाप्पा नामदेव सरगर रा . बोधगीरेवस्ती कोळा ता सांगोला हे २७ ऑगस्ट रोजी रात्रौ आठच्या सुमारास कुटुंबासह जेवन करीत असताना त्यांचे वडील नामदेव सरगर हे पत्र्याच्या शेडमध्ये बसले होते.
सदर शेडमध्ये भांडणाचा आवाज आल्याने संगाप्पा सरगर हे भाऊ विठ्ठल सरगर , दिपाली विठ्ठल सरगर , मंगल संगाप्पा सरगर असे सर्वजन त्या ठिकाणी गेले. त्यावेळी नामदेव आबा सरगर यांना संदिप आनंदा सरगर , तानाजी सोपान उर्फ आनंदा सरगर , सोपान उर्फ आनंदा श्रीपती सरगर , जगन्नाथ श्रीपती सरगर हे सर्वजन काठीने दगडाने मारहाण करत होते.
त्यानंतर सर्वजन घरी गेल्यानंतर अजय जगन्नाथ सरगर , प्रमोद महादेव आलदर , भामाबाई सोपान उर्फ आनंदा सरगर , शशिकला जगन्नाथ सरगर , पुनम तानाजी सरगर सर्व रा.बोधगीरेवस्ती कोळा ता . सांगोला यांनी संगाप्पा सरगर यांच्या घराचा दरवाजा तोडुन दोन हजार रुपयांचे नुकसान केले.
तसेच विठ्ठल सरगर , दिपाली सरगर , विक्रम सरगर यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी संगाप्पा नामदेव सरगर यांनी वरील नऊ जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
A case has been registered against nine persons for threatening and beating in Sangola
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज