मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात धान्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. बोगस ७/१२ दाखवून शेतकर्यांना मिळणारे धान्यासाठीचे अनुदान लाटण्याचा प्रकारअतिशय गंभीर असून, यासंदर्भात तातडीने विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात येऊन दोषींना कठोर शासन करण्यात यावे, असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल दिले. Assembly Speaker Nana Patole’s order to appoint SIT
यासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील, गृह, पणन आणि आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधिक्षक, भंडारा यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार आरोपींनी आदिवासी विकास महामंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, देवरी येथे आधारभूत खरेदी योजने अंतर्गत नियमबाह्य धान्य वाहतूक करून तसेच बोगस कागदपत्रे बनवून महामंडळाची फसवणूक केलेली आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामामध्ये सन २०१९ व २०२० मध्ये धान्य खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
गडचिरोली येथेही धान्य खरेदी पणन हंगाम सन २०१८-२०२० मध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. बोगस ७/१२ दाखवून शेतकर्यांचे अनुदान लाटणे, मृत्यू झालेल्या वा शेत जमीन नसलेल्यांच्या नावे अनुदान घेणे, वन विभागाच्या जागेत धान्य शेती लागवड झाल्याचे दाखवून अनुदान उचलणे, इत्यादी गंभीर प्रकार या जिल्ह्यांमध्ये उघडकीस आले आहेत. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात गैरव्यवहाराचे प्रकार झाले आहेत.
शेतकर्यांशी संबंधित या संवेदनशील प्रश्नी दोषींना कडक शासन झाले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेत यासंदर्भात सखोल चौकशी व्हावी आणि आरोपींची साखळी जेरबंद व्हावी, यासाठी विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात यावे, असे निर्देश दिले.
Corruption in grain procurement in Bhandara, Gondia, Gadchiroli and Chandrapur districts
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज