टीम मंगळवेढा टाईम्स । माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील बचतगट व मायक्रो फायनान्स यांच्या कर्जवसुली व अर्वाच्च बोलण्याला वैतागून 15 कुटुंबातील सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इच्छामरण बाबत परवानगी मागणारे निवेदन दिले आहे.
सदर निवेदन मध्ये वेळापूर येथील सिकंदर कोरबू यांनी लॉक डाऊन व कोरोना मुळे अर्थव्यवस्था ढासळलेली आहे व अश्यातच बचतगट व मायक्रो फायनान्स यांचे प्रतिनिधी घरी येऊन कर्जवसुली साठी तगादा लावत असून अर्वाच्च भाषेत बोलत असल्याचे म्हंटले आहे.
यामुळे कोरबू यांनी मुख्यमंत्र्यांकडे दि. ०७ सप्टेंबर पर्यंत आपण इच्छामरण ची परवानगी दयावी अन्यथा आपण परवानगी दिली असे समजून महाराष्ट्रातील कोणत्याही तहसील कार्यालयासमोर आपण आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
यांसह वेळापूर येथील अन्य 14 कुटुंबातील सदस्यांनी ही मुख्यमंत्री यांच्याकडे अशीच इच्छामरण बाबत परवानगी मागितली असून शासनाने एकतर सर्वसामान्य माणसांनी व महिलांनी घेतलेली बचतगट व मायक्रो फायनान्स यांची कर्ज माफ करावीत अन्यथा आम्हांला इच्छामरनास परवानगी द्यावी व आमचा मानसिक व आर्थिक छळ कमी करावा अशी विनंती केली आहे.
हे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, तहसीलदार माळशिरस, प्रांताधिकारी अकलूज, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज त्याचसोबत आमदार राम सातपुते, आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांना देऊ केली आहेत.
मुख्यमंत्र्यांना तातडीने पत्र देऊन सदर प्रकरणी मार्ग काढू : आमदार सातपुते
आमदार राम सातपुते यांनी आज सदर कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन तणावात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका, आजच मी मुख्यमंत्री महोदयांना तातडीने पत्र देऊन सदर प्रकरणी आपण मार्ग काढुयात असे आश्वासन दिले आहे.
सर्वसामान्य जनतेला सक्षम न करता मृत्यूस कारणीभूत ठरविणारे बचत गट-कोरबू
सर्वसामान्य जनतेला सक्षम व आर्थिक दृष्टीने मदत करण्यासाठी महिला बचत गट व मायक्रो फायनान्स हे काम करीत असतात मात्र तालुक्यातील बचत गट व मायक्रो फायनान्स हे त्यांना मृत्यूच्या तोंडात ढकलणारे असून त्यांना जागतिक महामारी सुद्धा समजत नाही. त्यामुळे मी इच्छामरण ची मागणी केली आहे. – सिकंदर कोरबू, वेळापूर
Solapur velapur Self-help group, microfinance hurts 15 families seeking permission to die
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज