टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही कोरोनामुळे शहरात तीनजणांचा तर ग्रामीणमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३९० रुग्ण वाढले आहेत. ग्रामीण ३३७ महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मंगळवारी एकूण १२६२ कोरोना चाचण्या झाल्या. यातून ५३ रुग्ण आढळून आले.
यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या १२१ जणांना डिस्चार्ज मिळाला. अजूनही २०११ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
राघवेंद्र नगर मजरेवाडी परिसरातील ७१ वर्षीय व्यक्तीचे १७ जानेवारी रोजी यकृताच्या कर्करोगाचे निदान झाले होते. २६ जानेवारी रोजी त्यांना कर्वेकर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.
तेथून पुढे २८ जानेवारी रोजी रात्री १० वाजून १९ मिनिटांनी अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना ३० जानेवारी रोजी रात्री दीड वाजता या व्यक्तीचे निधन झाले.
कुमारस्वामी नगर शेळगी परिसरातील ४८ वर्षीय व्यक्तीला २५ जानेवारी रोजी नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दि.२९ जानेवारी रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना 31 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता निधन झाले.
सेटलमेंट फ्री कॉलनी क्र.६ येथील ८५ वर्षीय महिलेला २४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता धनराज गिरजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ३१ जानेवारी रोजी सकाळी ६.२५ वाजता त्यांचे निधन झाले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत मंगळवारी एकूण २२६० कोरोना चाचण्या झाल्या. यातून ३३७ आढळून आले. यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या ३८३ जणांना डिस्चार्ज मिळाला.
चव्हाणवाडी दें, ता. माढा येथील ७२ वर्षीय व्यक्तीला २९ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता अश्विनी हॉस्पिटल कुंभारी येथे दाखल करण्यात आले होते. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता त्यांचा मृत्यू झाला.(स्रोत:लोकमत)
माढा, सांगोला, माळशिरसमध्ये सर्वाधिक रुग्ण
ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत ३३७ रुग्ण वाढले. यात अक्कलकोट तालुक्यातील ५, मंगळवेढा १५,,बार्शी ३९, करमाळा २०, माढा ५७, माळशिरस ४४, मोहोळ २५, उत्तर सोलापूर १५, पंढरपूर ४४, सांगोला ५८, दक्षिण सोलापूर तालुक्यातील १५ रुग्णांचा समावेश आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज