टीम मंगळवेढा टाईम्स । अचानकपणे आजारी पडलेल्या सासऱ्याचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने आणि कुटुंबातील काही सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने तणावातून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरात घडली आहे.
कोरोनाने अनेक कुटुंबांतील कर्त्या पुरुष – महिलांचा बळी घेतला आहे.ज्योती स्वप्नील वानकर (वय 30) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी गुरुवारी राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती जोडभावी पोलिसांनी दिली.
शेळगी परिसरातही कोरोनाचे अनेक रुग्ण आजवर आढळले आहेत. या परिसरातील माकणे प्लॉटमध्ये राहणाऱ्या ज्योती वानकर यांना सासऱ्याचा अचानक मृत्यू होणे ही घटना जिव्हारी लागली होती.
त्यांच्या बहिणीलाही त्या सतत दूरध्वनीवरून याबाबत बोलत होत्या. दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्याचेही त्यांनी टेन्शन घेतले होते, असे पोलिसांना त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.
तणावातूनच त्यांनी राहत्या घरी गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास गळफास घेतला. त्यानंतर जोडभावी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई आर. एस. माने यांनी व त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना बेशुद्ध आवस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट व पोलिस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.
In Solapur, a married woman was strangled by Corona’s stress
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज