टीम मंगळवेढा टाईम्स ।
नव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्चचर यंत्रणांना मिळाली आहे.
त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांच्या उद्याच्या साप्ताहिक आणि इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांच्या आज 31 डिसेंबरच्या साप्ताहिक आणि सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मुंबईवर आज हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांच्या आज सर्व सुट्या रद्द केल्या आहेत.
दरम्यान, सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रमुख स्थानकं जसे दादर, वांद्रे, चर्चगेट, सीएसएमटी, कुर्ला आणि इतर स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
In view of the alert in Mumbai, tight security has been deployed at the major stations of Mumbai, Dadar, Bandra Churchgate, CSMT, Kurla and other stations. Tomorrow more than 3000 railway officers will be deployed: Quaiser Khalid, Commissioner of Police, Mumbai Railway
— ANI (@ANI) December 30, 2021
आज 3000 हून अधिक रेल्वे अधिकारी तैनात केले जातील, अशी माहिती मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त क्वेसर खालिद यांनी दिली आहे.
कलम 144 लागू
दरम्यान, मुंबईत पुन्हा कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत 7 जानेवारीपर्यंत कलम 144 जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच मोठ्या पार्ट्यांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली असून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
त्यात गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीमुळे शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज