टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर परिसर असलेल्या एका बंगल्यावर दि 24 च्या पहाटे तीन वाजता दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत कुटुंबातील सदस्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा साडेचार लाखाचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे.
आज्ञात दराेडेखोऱ्याविरोधात गून्हा दाखल झालाय, या घटनेचे वृत्त समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की मंगळवेढा शहरालगत असणाऱ्या धर्मगाव रोडवर फिर्यादी मंदाकिनी अंबादास सावंजी ह्या त्यांच्या बंगल्यात राहत असून दि 24 च्या पहाटे साडेतीन वाजता
अज्ञात सहा दरोडेखोरांनी कटणीच्या सहाय्याने कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करून फिर्यादीच्या गळ्याला चाकु लावून जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील सोने,
घरातील पैसे काढून द्या अन्यथा तुम्हाला खल्लास करू असे म्हणत नववधू च्या अंगावरील व फिर्यादीच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले तसेच या झटापटीत यातील फिर्यादीच्या अंगठ्या जवळच्या बोटाला जखम झाली आहे
चोरटे हे अंदाजे 30 ते 35 वयोगटाचे असल्याचा अंदाज असून त्यांनी अंगात जर्किन, हातात ग्लोज, तसेच लोखंडी सळी, हातात स्टीलचे कडे, डोक्याला रुमाल बांधलेल्या अवस्थेत होते.
चोरट्यानी महिलांच्या कानातील दागिने निघत नसल्याने दरोडेखोरांनी कात्रीच्या साह्याने कट मारून काढून घेतले या घटनेत सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व कपाटातील रोख रक्कम असे एकूण साडेचार लाखाचा ऐवज लुटून नेला आहे.
लग्नात आलेल्या साड्या व कपडे ह्या वस्तू घेऊन गेले आहेत दरोडेखोरांनी जाताना कुटुंबीयांना एका खोलीत कोंडून बाहेरून कडी लावून गेले त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी मदतीसाठी शेजाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क साधत सुटका करून घेतली.
या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधिकारी हिम्मतराव जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर स्वानपथक मागवण्यात आले ते स्वान घटनास्थळापासून पिकातून दामाजी कारखाना रस्त्यावरील सूत मिळपर्यंत गेले.
याबाबत अज्ञात सहा चोरट्या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज