टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी अकलूज नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व व्यावसायिक, दुकानातील कर्मचारी, गाळेधारक,
आठवडा बाजार आणि भाजी विक्रेते यांना कोरोना लसीचे दोन मात्रा घेतल्याशिवाय व्यवसाय करण्याची मुभा नाही असे आदेश दिले आहेत.
माळशिरस तालुक्यात कोरोना लसीकरण मोहिम जोरदार राबविण्यात येत आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते यांनी प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालयात लसीकरण मोहिम सुरु केली आहे.
याच धर्तीवर अकलूज नगरपरिषदेने लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
अकलूज नगरपरिषदेचे कर्मचारी हे कार्यक्षेत्रामध्ये सर्व व्यवसायिक , गाळेधारक आणि भाजी विक्रेते यांचे कोरोना लसीचे दोन मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र तपासणी मोहिम सुरु केली आहे.
अकलूज नगरपरिषद हद्दीत व्यवसाय करणाऱ्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेणे सक्तीचे केले आहे.
ज्या व्यापाऱ्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या नाहीत त्यांना दुकान उघडण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज