टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील वकिली व्यवसाय करणाऱ्या राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा अँड.सुप्रिया गुंड-पाटील यांना शेजाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसात पतीपत्नी विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, फिर्यादी हे धर्माधिकारी प्लॉट गडेगाव रोडवर राहतात. त्यांच्या शेजारीच शिराळकर रहात असून,
फिर्यादीच्या घराचे कंपाऊंडचे प्लास्टरचे काम सुरू असताना त्यांनी विरोध करून हे काम करावयाचे नाही असे म्हणून शिवीगाळ केली.
मी एसआरपीत काम केले आहे माझ्या वरपर्यंत ओळखी आहेत, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दोघांवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदला आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज