टीम मंगळवेढा Times ।
ऐन हिवाळ्यात बरसणाऱ्या पाऊसधारांमुळे उजनी धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने कुठल्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यासाठी नदीकाठच्या गावांना उजनी धरण व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला तरी पावसाळ्याचे वातावरण बदलताना दिसत नाही. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली असून आणखी पाउस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उजनी पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून चांगला पाऊस झाल्याने उजनी धरणाची पाणीपातळी वाढली आहे.
पुणे परिसरातील अनेक धरणातून उजनी धरणात पाणी येत असते आणि या सर्व धरण क्षेत्रात पाउस होत आहे त्यामुळे उजनी धरणाच्या पातळीत वाढ होणे स्वाभाविक आहे.
उजनी धरणात सद्या १०५ टक्के पाणी साठा आहे आणि रोजच्या पावसाने कमी वेगाने का होईना पण पातळीत वाढ होत आहे.
पाऊस आणि पाणीपातळी याचा विचार करता उजनी धरणातून कुठल्याही क्षणी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो त्यामुळे नदीकाठच्या गावांना, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा उजनी धरण व्यवस्थापन प्रशासने दिला आहे.
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना अवकाळी पावसाने चांगलाच दणका द्यायला सुरुवात केली आहे. हा पाउस आणखीही कोसळण्याची शक्यता असल्याने उजनी धरणातून पाणी सोडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज